Lok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचा 'भाजप'मध्ये प्रवेश
Gautam Gambhir Joins BJP (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय हालचालींना उधाण आले आहे. पक्षांतर सुरु आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटींची नावांचीही निवडणूकीच्या रिंगणात चर्चा आहे. त्यापैकी काही अफवा असल्या तरी काही वृत्त खरी ठरत आहेत. या चर्चेत माजी क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचेही नाव होते. गौतम गंभीर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा खरी ठरली आहे. आज दिल्लीत गौतम गंभीरने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली(Arun Jaitley), कायदा व न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला की, "मी नरेंद्र मोंदीच्या व्हिजनने अत्यंत प्रभावित आहे आणि त्यामुळे मी भाजपत प्रवेश केला आहे. या पक्षात येण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मी अत्यंत सन्मानित झालो आहे."

ANI ट्विट:

भारतीय जनता पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली असून उत्तर प्रदेशातील वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. तर अमित शहा यांना गुजरात मधील गांधीनगर मधून तिकीट देण्यात आले आहे.