Video: सपना चौधरी हिच्या गाण्यावर IPS अधिकारी डान्स करु लागताच महिला पोलिसही थिरकले
Delhi Police Dance on Sapna Choudhary Song Teri Aakhya Ka Yo Kajal | (Photo Credit- Twitter)

सपना चौधरी (Sapna Choudhary) हिने केवळ हरियाणवी (Haryanvi)इतक्याच नव्हे तर, भोजपुरी (Bhojpuri), पंजाबी (Punjabi) आणि बॉलीवुड (Bollywood)क्षेत्रातही आपल्या डान्सचा जला दाखवला आहे. सपना चौधरी हिचे 'तेरी आख्या का यो काजल' (teri aakhya ka yo kajal)हे गाणे जेव्हा डिजेवर वाजायला लागते तेव्हा भलेभलेही थिरकायला लागतात. राजधानी दिल्ली येथील महिला पोलिसांच्या कार्यक्रमात असेच काहीसे पाहायाल मिळाले.

ऑल वुमन संपर्क सभेच्या माध्यमातून 'सुने सहेली' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी महिला पोलिसांनी व्यसापीठावर सपनाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. सुरुवातीला सपना चौधरी हिचे 'तेरी आख्या का यो काजल' हे गाणे सुरु झाले. हे गाणे लागताच तिथे उपस्थित असणाऱ्या दोन महिला पोलिसांनी गाण्यावर ठेका धरला. हळूहळू इतर महिला पोलिसांनीही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आणि अल्पावधीत वातावरणात एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. महिला आयपीएस अधिकारी बेनिता मेरी जेकर यांनी या गाण्यावर जेव्हा ठेका धरला तेव्हा, उपस्थितांमध्ये एक वेगळाच जोश संचारला. हा कार्यक्रम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी होता. (हेही वचाा, Lok Sabha Elections 2019: नृत्यांगना सपना चौधरी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; मथुरा येथून Hema Malini यांना टक्कर देण्याची शक्यता)

ट्विटमधील व्हिडिओ

दरम्यान, सपना चौधरी आगोदरच प्रसिद्धीच्या झोतात असते. परंतू, सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आणि ती पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली. सपना चौधरीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 11 व्या पर्वात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने लोकप्रियतेचे आणखी एक शिखर गाठले. सपनाने आतापर्यंत भोजपूरी, हरियाणवी, पंजाबी आणि बॉलिवूडच्या गाण्यावर केलेला डान्स तुफान लोकप्रिय ठरला आहे.