Lok Sabha Elections 2019: हिरीयाणाच्या नृत्यांगना सपना चौधरी (Sapna Chaudhary) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. चौधरी यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमातून माझ्या काँग्रेस प्रवेशाबाबत जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत ती सर्व जुनी आहेत. निवडणूक लढविण्याची आपली सध्यातरी कोणतीही इच्छा नाही. मी एक कलाकार आहे आणि माझ्यासाठी सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. निवडणूक लढण्याचा माझा कोणताही विचार नाही, असेही सपना चौधरी यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सपना चौधरी यांनी म्हटले आहे की, आपण काँग्रेसचा प्रचारही करणार नाही. जर मला राजकारणात यावेसे वाटले तर, मी स्वत: आगोदर त्याबाबतची माहिती देईन.
दरम्यान, सपना चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले होते. सपना चौधरी ( Sapna Choudhary News) यांना काँग्रेसकडून भाजप (BJP) मथुरा लोकसभा मतदारसंघ (Mathura Seat) उमेदवार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या विरोधात निवडणूक तिकीट दिले जाण्याची शक्यताही प्रसारमाध्यमांनी वर्तवली होती. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, चौधरी यांच्या खुलाशामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: नृत्यांगना सपना चौधरी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; मथुरा येथून Hema Malini यांना टक्कर देण्याची शक्यता)
एएनआय ट्विट
#WATCH Haryanavi singer & dancer Sapna Chaudhary says, "I have not joined the Congress party. The photograph with Priyanka Gandhi Vadra is old." #LokSabhaElections2019 pic.twitter.com/brcvaKOAIQ
— ANI (@ANI) March 24, 2019
सपना चौधरी या आपल्या बहारदार नृत्यामुळे युट्युब आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल असतात. आपल्या दिलखेच अदांनी अनेकांना घायळ करणाऱ्या आणि बिग बॉस सारख्या रिअॅलीटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे.