Disha Salian | (Photo Credit: Archived, edited, representative images)

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन (Disha Salian) हिचे गूढ मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे आणि नव्याने चौकशीची मागणी केली आहे. सतीश यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीवर हल्ला करून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी शिवसेना (यूबीटी) (Shiv Sena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि सखोल चौकशीसाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI Investigation) कडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. खरे तर दिशा हिच्या मृत्यूस पाच वर्षे उलटून गेल्यांतर दाखल झालेल्या याचिकेत पुन्हा एकदा आदित्य यांचा उल्लेख आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्यास ह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वादावर राजकीय प्रतिक्रिया

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात हे प्रकरण आणखीच तापले आहे.

याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, 'पोलिसांच्या तपासात हा खून नसून अपघात असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही याचिका घटनेच्या पाच वर्षांनंतर आली आहे, ज्यामुळे ती राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सिद्ध होते. औरंगजेब प्रकरणाचा फायदा घेण्यात अपयशी ठरल्यानंतर, ते आता दिशा सालियनच्या प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत.' (हेही वाचा, Disha Salian Death Case: 'कलानगरमध्ये बसला आहे सर्वात मोठा शक्ती कपूर'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर Nitesh Rane यांची आदित्य ठाकरेंवर टीका (Video))

'पोलिसांकडे खून किंवा बलात्काराचे पुरावे नाहीत'

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सीआयडी अहवालाचा संदर्भ देत म्हटले आहे की, 'कोणताही राजकीय दृष्टिकोन सापडलेला नाही. पोलिसांना खून किंवा बलात्काराचे कोणतेही पुरावे नाहीत. राजकीय पक्षांनी राजकीय फायद्यासाठी अशा प्रकरणांचा वापर करणे थांबवावे.' (हेही वाचा, Disha Salian Death Case: भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; दिसासालियन मृत्यू प्रकरण)

आधीच कायदेशीर कारवाई का नाही?

महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी याचिकेच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, 'जर अन्याय झाला असेल तर त्यांनी आधीच कायदेशीर कारवाई का केली नाही?'

'सरकार कोर्ट आदेशाचे पालन करेन'

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्वासन दिले की सरकार न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करेल.

निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजपकडून वापर

राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपीचे आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचा बचाव करताना म्हटले की, 'आम्हाला खात्री आहे की आदित्य ठाकरे यात सहभागी नाहीत. परंतु भाजप अशा प्रकरणांचा निवडणुकीसाठी वापर करण्यासाठी ओळखले जाते, जसे त्यांनी बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत केले होते.'

प्रकरणाचे राजकारण नको

महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाच्या राजकीय शोषणावर टीका केली आणि म्हटले की, 'या मुद्द्याचे राजकारण करणे अयोग्य आहे.'

'न्याय मिळाला पाहिजे'

महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी सतीश सालियन यांच्या याचिकेचे समर्थन करत म्हटले की, 'तिचा मृत्यू संशयास्पद होता. आता तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळे पीडितांना न्याय मिळाला पाहिजे.'

मुंबई महापालिका निवडणुका नजिकच्या काळात होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुंबई महापालिकेवर पाठिमागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता आहे. दरम्यानच्या काळात शिवसेना फुटली. असे असले तरी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची पकड मुंबई महापालिकेवर कायम आहे. अशा वेळी दिशा सालियान प्रकरणाचा वापर करुन आदित्य ठाकरे यांना अडकवत पालिका निवडणुकीत त्याचे भांडवल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार असावा, अशी चर्चा विरोधी पक्षांमध्ये सुरु आहे.