दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या गूढ मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद आत्महत्येच्या काही दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता, जी आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. मात्र, दिशाच्या पालकांनी सांगितले की तिने आत्महत्या केली नाही, तर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आले आहे. सुमारे 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. या प्रकरणात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात केली आहे.
सतीश सालियन यांनी त्यांच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की ही हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. तिच्या वडिलांन आज जी नावे घेतली ती मी पहिल्या दिवसांपासून घेत होतो. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काय काय केले होते हे दिशाच्या वडिलांनी याचिकेतून सांगितले आहे. आता त्यावेळी आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसला आहे, त्याला आधी आवरा.’ (हेही वाचा: Uddhav Thackeray on Nagpur Violence: ‘डबल इंजिन सरकार अपयशी ठरले, त्यांनी राजीनामा द्यावा’: नागपूर हिंसाचारावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया)
Disha Salian Death Case:
Mumbai, Maharashtra: On Actor Sushant Singh Rajput's manager Disha Salian death case, Minister Nitesh Rane says, "I have been saying from day one that this is a murder and should be investigated. Aaditya Thackeray's role must be examined. I have been demanding an investigation… pic.twitter.com/gX4nFBQeqy
— IANS (@ians_india) March 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)