Congress ‘Worker’ Tries to Commit Suicide (Photo Credits: ANI)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीनामा सादर केल्यानंतर अनेक स्तरातून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी होत आहे. मात्र राजीनाम्याच्या निर्णयावर राहुल गांधी अगदी ठाम आहेत. म्हणूनच राहुल गांधी यांची मनधरणी करण्यासाठी एका कार्यकर्त्याने काँग्रेस मुख्यालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या या कार्यकर्त्याला लोकांनी अडवले. यावर राहुल गांधी यांना राजीनामा मागे घ्यावा अन्यथा आत्महत्या करेन, असे या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. (राहुल गांधी यांच्या घराबाहेर काँग्रेस युवा कार्यकर्त्यांचा ठिय्या, राजीनामा मागे घेण्यासाठी सुरु आहे मनधरणी)

राहुल गांधी यांनीच काँग्रेस अध्यक्ष असावे, यासाठी मंगळवारी पक्ष मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन केले. यात एकता दाखवण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत राजीनामा देणारे पदाधिकारी देखील सहभागी होते.

ANI ट्विट:

इतकंच नाही तर यापूर्वी काँग्रेसची सत्ता असलेल्या पाच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेत राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली होती.

लोकसभा निवडणूक 2019 मधील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारत राजीनामा सादर केला होता.