Congress Youth Leaders In Front Of Rahul Gandhi House In Delhi (Photo Credits: ANI)

नवी दिल्ली: काँग्रेस (Congress President) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच युपीए (UPA)  अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांच्यासमवेत काँग्रेस खासदारांच्या बैठकीत उपस्थिती लावली, यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरून चर्चा झाली होती, ज्यामध्ये त्यांनी आपला निर्णय ठाम असल्याचे स्पष्ट केले. राहुल यांच्या निर्णयावर त्याचवेळी तब्बल 51 खासदारांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण सर्वांच्या विनंतीला नाकारत राहुल यांनी अध्यक्षपद सोडणारच असा हट्ट धरून ठेवला. यानंतर, आज पुन्हा मेंबर्स ऑफ युथ काँग्रेस अँड वर्कर्स (Members of Youth Congress) संघटनेच्या सदस्यांनी राहुल यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या बाहेर एकत्र जमून त्यांची मनधरणी करायला सुरुवात केली आहे.

दिल्ली काँग्रेसचे कार्यकर्ते आज, राहुल गांधी यांच्या मध्य दिल्लीतील तुघलक लेन वरील घरासमोर जमले आहेत. कार्यकर्तांनी यावेळी, राहुल जी, राजीनामा मागे घ्या, देशाला तुमची गरज आहे अशी घोषणाबाजी केली. लोकसभा निवडणुकीत यंदा काँग्रेस पक्षाने मित्रपक्षांसोबत मिळून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती मात्र त्यानंतरही देशात भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले, तर काँग्रेसला देशात केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभवाने निराश झालेल्या राहुल गांधींनी काहीच दिवसात काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचे सत्र सुरु आहे पण अद्याप राहुल यांचा विचार बदलताना दिसत नाहीये.

ANI ट्विट

हे ही वाचा -काँग्रेसमध्ये पर्यायी अध्यक्ष निवडीबाबत हालचाली सुरु

दरम्यान येत्या काळात उत्तर प्रदेशातील 12 जागांसहित अन्य राजयांमध्ये साधारण वीस पोटनिवडणूका व्हायच्या बाकी आहेत अशा वेळी पक्षाचे नेतृत्व राहुल यांच्याकडे सोपवण्याचा काँग्रेसचा मानस आहे. पण आता यावर राहुल गांधी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.