राहुल गांधी (Photo Credits: ANI Twitter)

लोकसभेत झालेला दारुण पराभव आणि काँग्रेसचे निराशजनक निकाल यामुळे हताश झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) राजीनामा देण्याचा निश्चित केले आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून, काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे हंगामी अध्यक्ष नेमण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरु आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी स्विकारून राहुल यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही राहुल गांधी राजीनामा मागे घेतील, ही शक्यता फार कमी दिसतेय. अशा परिस्थितीत पक्ष कसा चालवायचा याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याला हंगामी अध्यक्ष नेमण्याचा विचार पुढे आला आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक निर्णय घ्यायचे, असा हा प्रस्ताव आहे.

राहुल यांनी राजीनामा दिल्याच्या दिवसापासूनच कार्यकारी अध्यक्ष व सामूहिक निर्णय समितीचा विचार पक्षात सुरू झाला होता. मात्र, राहुल राजीनाम्यावर ठाम असल्यानं सामूहिक नेतृत्वाच्या चर्चेनं पुन्हा जोर धरला आहे.

CWC Updates: राहुल गांधी हेच अध्यक्ष पदावर राहतील, कार्यकारिणीने राजीनामा फेटाळला: काँग्रेस

राहुल गांधी जरी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यास तयार नसले तरीही पक्षाचे नेतृत्व त्यांनीच करावे, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे.