राहुल गांधी यांचा काँग्रेस अध्यक्षपदाला अलविदा, स्मृती इराणी यांनी ,जय श्री राम म्हणत दिली  प्रतिक्रिया (Watch Video)
Smriti Irani On Rahul Gandhi Resignation (Photo Credits: PTI)

Rahul Gandhi Resignation: लोकसभेतील (Lok Sabha)  काँग्रेस (Congress) च्या दारुण पराभवाचे सर्व दोष आपल्या माथी घेत आज अखेरीस राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा  दिला, एक भलं मोठं चार पानांचं पत्र लिहून त्यांनी सर्वांना याबाबत माहिती दिलीच शिवाय आपल्या ट्विटर (Twitter) अकाउंट च्या हॅण्डल वरून देखील त्यांनी काँग्रेस अध्यक्ष ही पदवी काढून टाकली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणी केंद्रीय मंत्री व अमेठीच्या खासदार स्मृती इराणी (Smriti Irani) यांना पत्रकारांनी सवाल केल्यावर त्यांनी "जय श्री राम"  (Jai Shree Ram) म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत स्मृती यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणारी अमेठी मधूनच राहूल गांधी यांच्या विरुद्ध मोठा विजय मिळवला होता.

(Watch Video)

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून मागील काही दिवसात काँग्रेसच्या कार्यकारणीत बराच संभ्रम आढळून आला होता. या व्यतिरिक्त अनेक कार्यकर्ते सुद्धा राहुल यांना राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करत असल्याचे दिसून आले होते, काल तर एका काँग्रेस कार्यकर्त्याने चक्क राहुल यांच्या निवासस्थाना बाहेरच गळफास लावून घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, त्यामुळे आता तरी राहुल आपला विचारबदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहत आज, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा अधिकृत रित्या राजीनामा दिला आहे.

याबाबत बोलताना, राहुल गांधी यांनी आपल्याला काँग्रेस अध्यक्षपद देण्यासाठी सुरुवातीला सर्वांची आभार मानले मात्र आपण या पदासाठी उचित नाही असेही ते म्हणाले. तसेच पक्षाचे भवितव्य उज्ज्वल बघायचे असल्यास कार्यकारिणीने लवकरात लवकर आपल्या जागी नवा अध्यक्ष नेमून द्यावा अशी देखील त्यांनी विनंती केली, सूत्रांच्या अनुसार सध्या सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस अध्यक्षपद मिळवण्याच्या शर्यतीत अग्रेसर आहेत, मात्र येत्या काळात काँग्रेसची धुरा कोणाला सोपवली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.