राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम,भावनिक ट्वीट करत लवकर नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे आवाहन
राहुल गांधी (Photo Credits- PTI/File)

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या अपयशानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मनवण्याचे अनेक पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत. आज त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवा अध्यक्ष लवकर निवडा असे सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पदाच्या राजीनाम्यानंतर या पदाची धुरा तात्पुरती मोतीलाल व्होरा यांच्या हातात दिली जाईल अशी चर्चा रंगली आहे. मोतीलाल व्होरा (Motilal Vora) हे राहुल गांधींचे निकटवर्तीय असून त्यांची Interim Congress President नेमणूक होऊ शकते. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधीचे ट्वीट

चार पानांचे पत्र लिहीत राहुल गांधी यांनी अनेक कॉंग्रेस नेत्यांना लोकसभा 2019 च्या पराभवासाठी जबाबदार ठरले आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, आता अधिक वेळ न दवडता, कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदासाठी नवा नेता लवकर निवडा. 'मी या प्रक्रियेचा भाग नसेन, मी माझा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे आता मी त्याचा भाग नाही. CWC ने याबाबत लवकर निर्णय घेऊन नेता निवडा' असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

ANI Tweet  

सध्या सुशीलकुमार शिंदे,बाळासाहेब थोरात या महाराष्ट्रातील नेत्यांची नावं कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहे. सुशील कुमार शिंदे यांच्या रूपाने स्वतंत्र भारतामध्ये ते पहिले  महाराष्ट्रीयन कॉंग्रेस अध्यक्ष होतील. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीमध्ये अमेठीतून पराभूत झाले तर वायनाड मधून जिंकले आहेत.