Wedding Invitation Scam: व्हॉट्सॲपवर लग्नाची पत्रिका डाऊनलोड करणे पडले महागात; बंगळुरूमधील व्यावसायिकाची 5 लाखांची फसवणूक

बंगळुरूमधील एका व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर आलेली लग्नाची डिजिटल पत्रिका डाऊनलोड करणे महागात पडले असून, सायबर चोरट्यांनी अवघ्या 9 मिनिटांत त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये लंपास केले आहेत.

Wedding Invitation Scam: व्हॉट्सॲपवर लग्नाची पत्रिका डाऊनलोड करणे पडले महागात; बंगळुरूमधील व्यावसायिकाची 5 लाखांची फसवणूक

बंगळुरूमध्ये सायबर गुन्हेगारीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आलेल्या बनावट लग्नाच्या पत्रिकेमुळे ५,००,४४० रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. नूर नाहिद खान असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सायबर चोरट्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत चलाखीने ही चोरी केली असून, अवघ्या नऊ मिनिटांच्या कालावधीत बँक खाते रिकामे केले आहे.

पत्रिकेच्या नावाखाली 'एपीके' फाईलचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, खान यांना व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून लग्नाची डिजिटल पत्रिका असल्याचे सांगणारा संदेश आला होता. या संदेशासोबत एक 'एपीके' (APK) फाईल जोडलेली होती. खान यांनी ही फाईल डिजिटल पत्रिका समजून डाऊनलोड केली. मात्र, ही फाईल म्हणजे प्रत्यक्षात एक मालवेअर (घातक सॉफ्टवेअर) होते, ज्यामुळे त्यांच्या फोनचा ताबा चोरट्यांच्या हाती गेला.

 

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2026 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).