संजय निरुपम आणि मिलिंद देवरा (Photo: PTI And IANS)

काँग्रेस नेते मिलिंद देवरा (milind deora) यांना अध्यक्षपदावरुन (Mumbai Congress President) हटवण्याचा निर्णय योग्य होता. तसेच मिलिंद देवरा हे कार्यक्षम नव्हते आणि कार्यकर्त्यांना योग्य उर्जा देऊ शकले नाहीत. महत्वाचे म्हणजे, देवरा हे आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यास अपयशी ठरले, असा टोला संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी देवरा यांना लगावला आहे. सध्या माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikawad) यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवरा यांनी दक्षिण मुंबईतून 2009 साली खासदारकी मिळवली होती. मात्र, सलग 2 वर्ष अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याकडून त्यांचा दारुण पराभाव झाला आहे.

"मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काढण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेसने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ते कार्यक्षम नव्हते आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासही सक्षम नाहीत. विधानसभा निवडणुका अवघ्या 40 दिवसांवर आहेत. शिवसेना भाजपशी तुल्यबळ स्पर्धा करण्यासाठी विद्यमान अध्यक्षांनी प्रत्येकाला विश्वासात घ्यायला हवे," असे मत संजय निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. हे देखील वाचा-आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी एमआयएम - वंचित बहुजन आघाडी पक्षात फूट, स्वबळावर लढणार

संजय निरुपम यांचे ट्विट-

मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतून 2009 साली खासदारकी मिळवली होती. मात्र, 2014, 2018 या सलग 2 लोकसभा निवडणूकीत अरविंद सावंत यांनी देवरा यांचा दारुण पराभाव केला आहे. यामुळे संजय निरुपम यांनी देवरा यांच्यावर निशाना साधला आहे.