आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी एमआयएम - वंचित बहुजन आघाडी पक्षात फूट, स्वबळावर लढणार
प्रकाश आंबेडकर आणि असदूद्दीन ओवेसी (Photo Credits-Facebook)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र या पार्श्वभुमीवर एमआयएम (MIM)-वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) पक्षात फूट पडली आहे. याबाबत एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel)यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता एमआयएम आता स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युल्यावर काही तोडगा न निघाल्याने एमआयएमने वंचित आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु होती. परंतु जागावाटप समान होत असल्याने एमआयएमला असमाधानकारक वाटत होते. त्यामुळेच वंचित आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी फक्त 8 जागा एमआयएमला वंचित आघाडीकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वंचित जागावाटपाचा हा निर्णय अमान्य असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.('आंबेडकर, ओवेसी यांची आघाडी म्हणजे नवे डबके')

एमआयएम वंचित बहुजन आघाडीपासून वेगळे होत असल्याचा निर्णय एका पत्राद्वारे जाहीर केला आहे. तर औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक आहेत. परंतु आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जागावाटपाची तिढा सुटली नाहीच. त्यामुळे वंचित आघाडीपासून वेगळे होऊन स्वबळावर निवडणूक लढवली जाणार आहे. मात्र युती झाली नाही तरीही समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करु आणि औरंगाबाद येथे उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा होणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.