NDA 2 Cabinet: लोकसभा निवडणूक 2014 (Lok Sabha Election 2014) मध्ये मिळालेली सत्ता लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्ये कायम राखत पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA ने केला. भाजप आणि एनडीएने ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार उद्या (गुरुवार, 30 मे 2019) रोजी सत्तेवर येत आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, कोणते नवे चेहरे असणार तर, कोणाला डच्चू मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या उत्सुकतेच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबाबत चर्चेत असलेले हे काही चेहरे. अर्थात, या चेहऱ्यांच्या समावेशाबाबत एनडीए अथवा भाजपने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, ही नावे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चेत आहेत. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २३ कॅबिनेट मंत्र्यांसह ६० ते ६५ मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
या ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा संधी नाही?
प्राप्त माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार नाही. अमित शाह यांच्यावर पक्ष संघटन आणि देशभरातील पक्षाची कामगिरी याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आणि मंत्रीपद अशी दुहेरी जबाबदारी पेलने शाह यांच्यासाठी अडचणीचे ठरु शकेल. त्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होणे कठीण दिसते. दुसऱ्या बाजूला सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणे कठीण दिसते. दरम्यान, विद्यमान ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांपैकी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पुन्हा संधी मिळू शकते.
पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील जुने चर्चीत चेहरे
राजनाथ सिंह, नितिन गडकरी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर (हेही वाचा, मंत्रीपद तोंडावर असताना जनतेने दिला डच्चू; दिग्गजांच्या पराभवानंतर शिवसेना शोधणार नवे चेहरे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हन)
पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील नवे चर्चीत चेहरे
दरम्यान, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, NDA म्हणून इतर मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात संधी द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातून शिवसेना तर इतर राज्यांतून लोकजनशक्ती पार्ट, अकाली दल, अण्णाद्रमुक, यांसारख्या पक्षांनाही संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे राम विलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान, अनिल देसाई, अरविंद सावंत, भावना गवळी अशा चेहऱ्यांना मोदी मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.