
फ्लिपकार्टने (Flipkart) एका टीझरच्या माध्यमातून भारतात येत्या 2 जूनला सॅमसंग कंपनी दोन नवे स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार Samsung Galaxy M11 आणि Galaxy M01 उद्या अधिकृतपणे लॉन्च केल्यानंतर ग्राहकांना ते खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सॅमसंग कंपनी Glaxy M11 ला Galaxy M10 आणि Galaxy M10s चे अपग्रेड वर्जन असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला Galaxy M01 साऊथ कोरिया कंपनीचा नवा प्रोडक्स असणार आहे. फ्लिपकार्टवर एक टीझरमध्ये लॉन्च कधी करणार त्याची तारीख देण्यासह स्मार्टफोनबाबत सुद्धा सांगण्यात आले आहे.
सॅमसंग कंपनीच्या या दोन नव्या स्मार्टफोनच्ये लॉन्चिंग उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. परंतु स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र काही जुन्या रिपोर्ट्सनुसार Galaxy M11 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 10,999 रुपये आणि Galaxy M01 साठी ग्राहकांना 8,999 रुपये मोजावे लागू शकतात. Samsung Galaxy M11 यापूर्वीच UAE मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या फिचर्समध्ये 6.4 इंच डिस्प्ले, ऑक्टा-कोर प्रोसेसर, 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात येणार आहे.(1 जून पासून Flipkart वर सुरु होणार सेल, ग्राहकांना खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार)
तसेच Galaxy M01 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13MP असणार आहे. त्याचसोबत 4,0000mAh बॅटरी दिली जाणार आहे. फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. यापूर्वी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी एम01 मध्ये 5.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असू शकतो. जो वॉटरड्रॉप नॉचसह येण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉमकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसर असू शकतो. त्याचसोबत 3GB RAM, 32GB स्टोरेज आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.