FIR Against SP MLA Abu Azmi: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ठाण्यात सपा आमदार अबू आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; केली होती औरंगजेबाची स्तुती
नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून, उपमुख्यमंत्र्यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अबू आझमी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केले आहे. आझमींनी त्याला केवळ महानच म्हटले नाही तर, औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली असेही म्हटले. तो क्रूर शासक नव्हता, तो एक महान समाजसेवक होता, असेही ते म्हणाले. त्यांचे हे विधान समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निषेध व्यक्त करत, अबू आझमींवर तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले, आझमींची औरंगजेबाची स्तुती करण्याची हिंमत कशी झाली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अबू आझमीसारखे लोक अशी विधाने करून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीवरून, उपमुख्यमंत्र्यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अबू आझमी यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. अबू आझमी यांच्या विधानावर शिवसेना यूबीटी नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा: Abu Azmi Aurangzeb Remark: 'औरंगजेब क्रूर नव्हता', अबू आझमी यांचे वक्तव्य; सर्वपक्षीयांकडून संताप, माफीची मागणी, गुन्हा दाखल)
FIR Against SP MLA Abu Azmi:
Mumbai, Maharashtra | A case has been registered against SP MLA Abu Azmi at Wagle Estate Police Station by Shiv Sena MP Naresh Mhaske under BNS sections 299, 302, 356(1), and 356(2).
Naresh Mhaske alleged that Abu Azmi's remarks praising Mughal ruler Aurangzeb have hurt… https://t.co/hCFlvJP3l5
— ANI (@ANI) March 4, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2025 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

