
सॅमसंग (Samsung) कंपनीकडून नुकतेच त्यांचे फिटनेस ट्रॅकर डिवाइस Galaxy Fit2 भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने या स्मार्ट फिटनेस ट्रॅकरसाठी लाइटवेट डिझाइन, लॉन्ग लास्टिंग बॅटरी, स्लिम आणि अॅडवान्स ट्रॅकिंग फिचर्स दिले आहेत. कंपनीनेने केलेल्या दाव्यानुसार, Samsung Galaxy Fit2 फिटनेस डिवाइस सिंगल चार्जमध्ये 15 दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. Samsung Galaxy Fit2 भारतात 3,999 रुपयांना उतरवण्यात आले आहे. कंपनीने ते 16 ऑक्टोंबर पासूनच विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहे. हे स्मार्ट डिवाइस दोन कलर ऑप्शन म्हणजे ब्लॅक आणि स्कारलेट मध्ये येणार आहे.
Galaxy Fit2 ची टक्कर भारतात थेट Mi Band5 सोबत होणार आहे. याची किंमत 2499 रुपये आहे. Mi Band5 सुद्धा 15 दिवसांची बॅटरी बॅकअप देते.कंपनीच्या या स्मार्ट बॅन्ड बद्दल अधिक माहिती द्यायची झाल्यास ते वियरेबल रॅक्टँग्युलर 1.1 एमोलेड टच डिस्प्लेसह येणार आहे. यामध्ये 450 nits चे ब्राइटनेस मिळणार आहे. डिवाइस 3D कर्व्हड ग्लास आणि 70 हून अधिक डाउनलोड वॉच फेससह येणार आहे. त्यामुळे युजर्सला आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करता येणार आहे.(Samsung Galaxy S20 FE चे 256GB मॉजल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)
नव्या गॅलेक्सी फिटच्या तुलनेत Galaxy Fit2 मध्ये सॅमसंगकडून साइडला दिलेले बटन काढून टाकले आहे. त्याजागी स्क्रिनच्या वरील आणि खालील बाजूस वर्चुअल बटन दिले आहे. तसेच यासाठी 50 मीटर वॉटर रजिस्टेंस आणि एसेंशिअल वॉटर लॉक मोड ही दिले गेले आहेत. ज्यामुळे स्विमिंग आणि वॉटर बेस्ट अॅक्टिव्हिटीसाठी फायदेशीर ठरणार आहे. स्विमिंग वेळी फ्रंट की लॉक करुन Fit2 हे एखाद्या अॅक्सिडंटपासून बचाव करता येणार आहे. हे डिवाइस 5 ऑटोमेटिक ट्रॅक वर्कआउटसह येणार आहे. त्याचसोबत 90 हून अधिक वर्कआउट सपोर्ट यासाठी दिले गेले आहेत.