Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi: तुळशी विवाहानिमित्त Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

यंदा ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी होईल. याचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५ वाजून ०७ मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी केला जाईल.

Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi: तुळशी विवाहानिमित्त Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
Tulsi-Vivah-Wishes-In-Marathi

Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi: महाराष्ट्रात दिवाळी च्या सणाची सांगता तुलसीविवाह (Tulsi Vivah) संपन्न झाल्यानंतर होते. यंदा ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी होईल. याचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५ वाजून ०७ मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी केला जाईल. या दिवशी घरोघरी विशेष पूजन, व्रत आणि विवाह विधी केले जातात.मग या मंगलदिनाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना, परिवाराला देत हा दिवस आनंदमय करण्यासाठी खाली दिलेली मराठमोळी ग्रिटिंग्स, WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages शेअर करून या दिवसाला अधिक खास करू शकाल.

कार्तिक महिना भगवान नारायणांना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो. अशी भावना आहे त्यामुळे तुमच्या परिवार, आप्तेष्टांसोबत हा सण अधिक खास करू शकाल.

हिंदू कॅलेंडरप्रमाणे, तुळशी विवाहाचे आयोजन दरवर्षी प्रदोष काळात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केले जाते. या दिवशी तुळशीमातेचा विवाह विष्णूरूपी शाळीग्रामाशी होतो. तुळशीचं लग्न झाल्यानंतर हिंदू धर्मीयांच्या घरातही लग्नसराईची सुरूवात केली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2025 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).