Samsung Galaxy S20 FE चे 256GB मॉडेल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Samsung (Photo Credit: Fortune)

Samsung Galaxy S20 FE चे 256 GB स्टोरेज मॉडेल भारतीय बाजारात अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. तर हा स्मार्टफोन फक्त 128GB स्टोरेज मध्येच उपलब्ध होता. Galaxy S20 FE युजर्सला आता दोन स्टोरेज वेरियंटमध्ये आणि पाच विविध रंगाच्या ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन Exynos 900 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2020: अमेझॉनच्या सेलमध्ये Prime Members ना Apple iPhone 11 सह अन्य फोन, टीव्ही वर मिळत आहेत 'या' दमदार ऑफर्स!)

Samsung Galaxy S20 FE च्या 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 53,999 रुपये आहे. हा क्लाउड नेव्ही रंगात उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु होण्यासह युजर्सला तो Samsung.com व्यतिरिक्त ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येणार आहे. प्री-बुकिंग नंतर फोनसाठी सेल 28 ऑक्टोंबर पासून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याचे 128GB मॉडेल सेलसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 49,999 रुपये आहे. त्याचसोबत HDFC bank कार्डवर 4 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.(Samsung कंपनीची Reward Yourself ऑफर, लेटेस्ट स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना मिळणार संधी)

Samsung Galaxy S20 FE अॅन्ड्रॉइड 10Os वर काम करणार आहे. तो Octa Core Exynos 990 प्रोसेसवर आधारित आहे. फोनसाठी पॉवर बॅकअपसाठीौ 4500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 12MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 8MP चा टेलिफोटो शूटर दिला आहे. तर व्हिडिओ कॉलिंगसह सेल्फीसाठी यामध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. Samsung Galaxy S20 FE मध्ये दिलेला स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येणार आहे.