Amazon Great Indian Festival Sale 2020: Top LIVE Offers (Photo Credits; Amazon India)

Amazon Great Indian Festival Sale 2020 ची भारतामधील आगामी फेस्टिव्ह सीझनच्या पार्श्वभूमीवर सुरूवात झाली आहे. सध्या प्राईम मेम्बर्स साठी सुरू झालेला सेल आज रात्रीपासून अन्य मेंबर्सनादेखील खुला केला जाणार आहे. यामध्ये दमदार डिल्स, ऑफर्स यांची रेलचेल आहे. एचडीएफसी कार्ड होल्डर्सना यामध्ये फायदा मिळणार आहे. त्यांना 10% अधिक इंस्टंट सूट देण्यात आली आहे. 5000 च्या खरेदीवर क्रेडीट कार्डवर ग्राहकांना 1750 तर डेबिट कार्ड वर 1250 रूपये कॅशबॅक मिळतील. यंदा अमेझॉनने त्यांच्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर सेल आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. पण त्या सार्‍याच तुमच्या फायद्याच्या असतील असे नाही म्हणूनच टीव्ही, मोबाईल, अमेझॉन डिव्हाईज, हेडफोनवरील काही खास ऑफर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्या एकदा नक्की चेक करून तुमची Amazon Great Indian Festival Sale 2020 मधील खरेदी लिस्ट बनवा! ऑनलाईन शॉपिंगवेळी Fake Products कसे ओळखाल? 'या' टीप्स फॉलो करा.

Apple iPhone 11:

काही दिवसांपूर्वीच आयफोन 12 ची घोषणा झाल्यानंतर भारतामध्ये आयफोनच्या काही जुन्या मोबाईलच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामध्ये Apple iPhone 11 चादेखील समावेश आहे. अमेझॉनच्या सेलमध्ये हा Rs 47,999 ला मिळेल. यासोबत इयरपॉड आणि पॉवर अडाप्टरदेखील मिळेल. iPhone 12 Effect: Apple कडून आयफोन ची नवी सीरीज लॉन्च होताच भारतामध्ये iPhone 11, iPhone XR, iPhone SE च्या किंमती घटल्या; इथे पहा नव्या किंमती

OnePlus 8:

अमेझॉनच्या सेलमध्ये OnePlus 8 हा फोन Rs 39,999 ला उपलब्ध आहे. त्याची बाजारातील किंमत 42 हजारांच्या जवळ आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर अजून 16,400 रूपयांचे डिस्ककाऊंट मिळू शकते सोबतच तुम्हांला एचडीएफसी कार्डचा देखील फायदा होऊ शकतो.

Redmi Note 9:

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेल मध्ये रेडमी नोट 9 वरदेखील सूट आहे. हा फोन 13 हजाराला उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तुम्ही जुना फोन दिला तर त्यावर 11,950 रूपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.

Samsung Galaxy S20 Fan Edition:

Galaxy S20 FE हा नुकताच लॉन्च करण्यात आलेला फोन सीरीज Rs 45,999 ला उपलब्ध होईल. दरम्यान यावर4000 चे इंस्टंट ऑफर्सएचडीएफसी कार्ड होल्डर्सना असतील. सोबतच नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर्स आहेत.

Philips 58-inch 6600 series 4K TV:

Philips 58-inch 6600 series 4K TV हा टिव्ही सुमारे Rs 39,999 ला उपलब्ध आहे.

यामध्ये HDMI ports,USB ports आहे. एचडीएफसी बॅंकेचे कार्ड वापरून तुम्ही जुना स्मार्ट टीव्ही देऊन नवीन घेणार असाल तर तुम्हांला 11 हजारांची अधिक सूट देखील मिळू शकते.

Bose QuietComfort 35 II wireless headphones:

अमेझॉनच्या सेलमध्ये 19,980 रूपयांमध्ये Bose QuietComfort 35 II wireless headphones उपलब्ध आहेत. यावर्षी इतक्या कमी दरात पहिल्यांदाच हे हेडफोन उपलब्ध आहेत. 20 हजारापर्यंत तुमचं बजेट असेल तर हे हेडफोन तुमच्यासाठी मस्त डील आहे.

दरम्यान आजपासून पुढील महिनाभर सुरू राहणार्‍या या दमदार सेलमध्ये Amazon Fire TV Stick, Echo smart speakers, Kindle e-readers या वस्तू अनुक्रमे Rs 1,999, Rs 1,999 आणि 9,999 पर्यंत उपलब्ध होणार आहेत.