प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. अशातच ई-कॉमर्स वेबसाईट्स अॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्टसह (Flipkart) अन्य कंपन्या सुद्धा प्रोडक्ट्सच्या खरेदीवर शानदार सूट आणि ऑफर्स देत आहेत. मात्र ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तेव्हा काही गोष्टींसंदर्भात सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. खरंतर फेस्टिव सीजनच्या सेलवेळी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये ग्राहकांची काही वेळा फसवणूक होते. ऐवढेच नाही तर फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येते. तर 2018 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या एका सर्वे नुसार, ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइट्स मधून एक तृतीयांश पेक्षा अधिक बनावट प्रोडक्ट्सची विक्री केल्याचे दिसून आले होते. अशातच जर तुम्ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीने खरेदी कर असल्यास काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची फसवणूक सुद्धा होणार नाही. तर Fake Products ओळखण्यासाठी या काही टीप्स जरुर फॉलो करा.(Flipkart Big Billion Days, Amazon Great Indian Festival: TV खरेदी करायचा आहे? फ्लिपकार्ट, अॅमेझोन सेलमध्ये आहे संधी, पाहा पर्याय)

>>ऑनलाईन वेबसाइट तपासून पहा-

बहुतांश बनावट वेबसाइट्स असतात. ज्या लोकांना WhatsApp किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन वर भारी डिस्काउंट आणि डिल्स बद्दल अधिक माहिती देतात. या ऑफर्ससोबत एक लिंक सुद्धा दिली जाते. जी खोटी असून शकते. अशातच तुम्ही लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यापूर्वी ती खरी आहे की खोटी ते तपासून पहा. हे स्पष्ट आहे की, जर ती वेबसाइट खोटी असल्यास तुम्ही खरेदी करणारे प्रोडक्ट्स सुद्धा खोटेच असणार. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने प्रोडक्ट खरेदीवेळी URL बद्दल सावधगिरी बाळगा. खरी वेबसाइट https पासून सुरु होते. तर बनावट वेबसाइटची सुरुवात फक्त http पासून होते. त्यामुळे या दोन्ही मधील फरक जाणून घ्या.

>>अधिकृत वेबसाइट्स वरील प्रोडक्ट्स खरेदी करा-

प्रत्येक प्रोडक्ट्ससाठी एक मॉडेल क्रमांक दिला जातो. हा क्रमांक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईट्सवर टाकून प्रोडक्टची अधिकृत वेबसाइट येथून प्रोडक्ट्स बद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकते. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल खरेदी करत असल्यास तत्पूर्वी त्या ब्रँन्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. खरंतर ई-कॉमर्स साइट्सवर काही प्रोडक्ट्सची विक्री थर्ड पार्टीच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे खरे आणि बनावट प्रोडक्ट्स कोणते आहेत ते तपासून पहाणे थोडे कठीण होते.

>Smart Consumer अॅपच्या माध्यमातून प्रोडक्ट्स बद्दल तपासून पहा-

इलेक्ट्रॉनिक आणि FMGC कंपन्या नकली प्रोडक्ट्स विक्री पासून बचाव करण्यासाठी एक खास पद्धतीचा QR कोड आणि होलोग्राम लावतात. त्यामुळे खरे आणि बनावट प्रोडक्ट्स बद्दल लगेच कळून येते. या व्यतिरिक्त बनावट प्रोडक्ट्स संदर्भात तपासून पहायचे असल्यास FASSI च्या Smart Consumer अॅपची मदत घेऊ शकता.(Xiaomi चा Diwali With Mi Sale येत्या 16 ऑक्टोंबर पासून होणार सुरु, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार 'हे' फायदे)

त्याचसोबत बनावट प्रोडक्ट्स तपासून पाहण्यासाठी कंपनीचा लोगो आणि स्पेलिंग सुद्धा पहा. नकली सामान विक्री करणाऱ्या कंपन्या हुबेहुब अधिकृत असलेल्या प्रोडक्टसारखा Logo बनवतात. त्याचसोबत कपड्यांची जर तुम्ही खरेदी करत असल्यास त्यावेळी त्याच्या फॅब्रिकची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच नेहमीच लक्षात ठेवा की, ज्या प्रोडक्ट्सची खरेदी करणार आहात त्याचा अधिकृत पत्ता, इ-मेल. फोन क्रमांक आणि कॉन्टॅक्ट्स डिटेल्स दिले गेले आहेत का. ऐवढेच नाही तर एखाद्या प्रोडक्ट्सवर किंमती पेक्षा अधिक डिस्काउंट दिला जात असल्यास त्या गोष्टीला बळी पडू नका. जर तुम्हाला प्रोडक्ट्सवर 70-80 टक्के सूट मिळत असल्यास समजून जा ती वस्तू बनावट आहे.