फेस्टिव्हल सीझनची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर ई-कॉमर्स कंपन्यांकडून फेस्टिव्ह सेलचे आयोजन करण्यात येत आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांसोबत स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने सुद्धा स्व:ताचा एक स्वतंत्र सेलची घोषणा केली आहे. Diwali With Mi Sale येत्या 16 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे या सेलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. दिवाली विथ एमआय सेल 16 ऑक्टोंबर पासून सुरु होणार असून 21 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे.
शाओमीने ट्विटवर एक पोस्ट करत Diwali With Mi Sale ची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये धमाकेदार डिल्स मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्याचसबत शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी सुद्धा एक ट्विट करत सेल बद्दल माहिती दिी आहे. यामध्ये काही निवडणक एमआय युजर्सला सेलचा लाभ सुरु होण्यापूर्वी एक दिवस अगोदर घेता येणार आहे.(Flipkart Big Billion Days Sale 2020: बिग बिलियन डे सेल पूर्वीच ग्राहकांना अवघ्या एक रूपयामध्ये वस्तू Pre-Book करता येणार; इथे जाणून घ्या या धमाकेदार ऑफर्स बद्दल!)
Drumrolls, please! 🥁🥁
Mi fans, #DiwaliWithMi is back again with Dhamakedaar deals! 🥳
Gold, Diamond & Platinum members of the #MiVIPClub get early access to exclusive deals and free shipping on 15th October on https://t.co/9TUcV2lDHo.
RT 🔄 if you are excited! pic.twitter.com/kcKjzj0ILE
— Mi TV India (@MiTVIndia) October 9, 2020
दिवाली विथ एमआय सेलमध्ये फोन निर्माती कंपनी शाओमी विविध डिस्काउंट ऑफर करणार आहे. त्याचसोबत सेल दरम्यान, 1 रुपयात फ्लॅश सेल आणि क्रेझी डिल्स ऑफर सुद्धा असणार आहे. एमआयच्या डायमंड, गोल्ड आणि प्लॅटिनम VIP मेंबर्सला सेलच्या एक दिवस आधी सेलचा लाभ घेता येणार आहे. शाओमीच्या ट्विटनुसार, Mi Sale वेळी बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक कार्ड युजर्सला 1000 रुपयापर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळवता येणार आहे.(Amazon च्या वेबसाईट आणि अॅपवरही IRCTC च्या तिकीट बुकींगची सुविधा; पहा, कसे कराल ऑनलाईन तिकीट बुकींग?)
दरम्यान भारतात एकत्रित पणे काही दिवाळी सेल सुरु होणार आहेत. यामध्ये फ्लिपकार्टचा Big Billion Days Sale ची सुरुवात 10 ऑक्टोंबर पासून होणार आहे. तर Amazon India कडून Great Indian Festival Sale ची सुरुवात 17 ऑक्टोंबरला होणार आहे. त्याचसोबत अन्य कंपन्यांचे सुद्धा सेल सुरु होणार आहेत.