तुम्ही जर नवाकोरा दुरचित्रवाणी संच (Television Set) खरेदी करण्याबाबत विचार करत असाल तर एक छान पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन लवकरच आपला ऑनलाईन सेल सुरु करत आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) हा सेल येत्या ऑक्टोबरपासून सुरु करत आहे. तर अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल (Amazon Great Indian Festival) येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या सेलमध्ये आपण केवळ दुरचित्रवाणी (Television) संचच नव्हे तर मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टीवी आणि होम अप्लायंसेज सोबतच इतरही अनेक वस्तू खरेदी करु शकणार आहात. उल्लेखनिय असे की, या कालात स्मार्ट टीव्हीवर अधिक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. जर आपण स्मार्ट टीव्ही (TV) घेण्याचा अथवा अपग्रेड करण्याबाबत विचार करत असाल तर बिग बिलियन डेज आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल आपल्यासाठी एक चंगली संधी असू शकते. काही निवडक टीव्ही ब्रांड, मॉडेल त्यांचे फिचर्स आणि प्राप्त माहितीनुसार किंमत खालीलप्रमाणे.
टीव्ही ब्रांड, मॉडेल आणि फिचर्स, सेलमधील किंमत
मोटोरोला (Motorola)
- Motorola Revou 55 इंच अल्ट्रा एचडी
किंमत 40,999 रुपये
- Revou 43 इंच अल्ट्रा एचडी टीवी
किंमत 30,999 रुपये
- 32 इंच एचडी रेडी झेडएक्स 2
किंमत 13,999 रुपये
- 40 इंच फुल एचडी झेडएक्स 2
किंमत 19,999 रुपये
नोकिया (Nokia)
फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलमध्ये नोकियाचे 6 नवे स्मार्ट टीव्ही उपलब्ध असतील.
- 32 इंच एचडी रेडी स्मार्ट टीवी 12,999 रुपये,
- 43 इंच एचडी स्मार्ट टीवी 22,999 रुपये
- 43 इंच यूएचडी 4K स्मार्ट टीवी 28,999 रुपये
- 50 इंच UHD 4K स्मार्ट टीवी 33,999 रुपये
- 55 इंच यूएचडी 4K स्मार्ट टीवी 39,999 रुपये
- 65 इंच UHD 4K स्मार्ट टीवी 59,999 रुपये
वन प्लस (OnePlus)
वनप्लस टीवी वाय सीरीजचे टीवी बार फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.
- 32 इंच वेरियंट14,999 रुपय
- 3 इंच वेरियंट 24,999 रुपय
- टीवी सेलमध्ये 1000 रुपये सवलत मिळेल. तसेच एसबीआय कार्ड ग्राहकांना 10% इंस्टेंट
- डिस्काउंट मिळेल.
सॅमसंग (Samsung)
सँमसंग आपला The Frame 50 इंची टीव्ही 72,990 रुपयांमध्ये, 55 इंची टीव्ही 81,990 रुपये, 65 इंच टीवी 1,29,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. याशिवाय सॅमसंगची इतरही टीव्ही मॉडेल सेलमध्ये उपलब्ध असतील. (हेही वाचा, Vivo V20 Smartphone: विवो व्ही 20 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स)
दरम्यान, बिग बिलियन डेज आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये आपल्याला मोटोरोला (Motorola), नोकिया Nokia), वन प्लस (OnePlus), शिन्स्को (Shinco), थॉमसन (Thomson) यांसारख्या ब्रांडचे टीव्ही उपलब्ध होऊ शकतात.