Vivo V20 Smartphone: विवो व्ही 20 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स
Vivo V20 Smartphone (Photo credit - Twitter)

Vivo V20 Smartphone: स्मार्टफोन कंपनी वीवो आज आपला नवीन हँडसेट Vivo V20 भारतात लाँच करणार आहे. हा फोन व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. हा प्रक्षेपण कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरू होईल. तुम्ही हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर थेट पाहू शकतो. कंपनीने गेल्या महिन्यात थायलंडमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला होता. Vivo V20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सारख्ये फिचर्स देण्यात आले आहेत.

भारतात या नवीन विवो फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, टिप्स्टरनुसार, Vivo V20 स्मार्टफोन 24,990 रुपय किंमतीला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. प्राप्त माहितीनुसार, हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात स्नॅपड्रॅगन 720 जी एसओसी प्रोसेसर आहे. याशिवाय मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही फोनची मेमरी वाढवू शकता. (हेही वाचा - Redmi Smart TV A65 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

येथे पहा लाँन्चिंग कार्यक्रम - 

दरम्यान, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. याशिवाय यात 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात येण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.