Redmi Smart TV A65 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

रेडमीने गेल्या महिन्यात लवकरच एक नवीन स्मार्ट टीव्ही ए सीरीज लॉन्च करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता कंपनीने स्मार्ट टीव्ही Smart TV A55, A50 आणि A32 मॉडेल्स सादर केले आहेत. कंपनीने रेडमी स्मार्ट टीव्ही A 65 लाँच केला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या टीझरमध्ये स्मार्ट टीव्ही ए-मालिकेतील सर्वात मोठा टीव्ही 65 इंचाच्या स्क्रीनसह येणार असल्याचंही समोर आलं आहे.

Redmi Smart TV A65 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Redmi TV (PC - Twitter)

Redmi Smart TV A65: रेडमीने गेल्या महिन्यात लवकरच एक नवीन स्मार्ट टीव्ही ए सीरीज लॉन्च करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता कंपनीने स्मार्ट टीव्ही Smart TV A55, A50 आणि A32 मॉडेल्स सादर केले आहेत. कंपनीने रेडमी स्मार्ट टीव्ही A 65 लाँच केला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या टीझरमध्ये स्मार्ट टीव्ही ए-मालिकेतील सर्वात मोठा टीव्ही 65 इंचाच्या स्क्रीनसह येणार असल्याचंही समोर आलं आहे.

रेडमी स्मार्ट टीव्ही ए 65 मध्ये 65 इंची स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन HDR सपॉर्ट करते. तसेच यात हाई-पावर ड्यूल स्पीकर्स देण्यात आले आहेत. या स्मार्ट टीव्हीवर शाओमीने विकसित केलेला एक ऑडिओ अल्गोरिदम आहे. जो डीटीएस डिकोडिंगला सपोर्ट करतो. (हेही वाचा -Amazon Great Indian Festival Sale: 'अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'मध्ये OnePlus 8 5G स्मार्टफोनवर मिळणार 5 हजार रुपयांची सुट; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

या टिव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायच झालं, तर यात एक अल्ट्रा-नॅरो बेज़ल आणि पियानो पेंट टेक्स्चर आहे. या टीव्हीमध्ये 4-कोर ए 5 प्रोसेसर, 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्मार्ट टीव्ही HDMI, USB, नेटवर्क केबल इंटफेस, एंटीना इंटरफेस, एवी आउटपुट इंटरफेस आणि एस / पीडीआयएफसह येतो.

रेडमी स्मार्ट टीव्ही ए 65 ची किंमत 2,599 चिनी युआन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 28,300 इतकी आहे. हा टीव्ही चीनमधील Jingdong वर खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. ग्राहक यावरू तो खरेदी करू शकता. तुम्ही स्वस्तात टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असला तर, रेडमी स्मार्ट टीव्ही ए 65 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2020 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).