Amazon Great Indian Festival Sale: 'अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'मध्ये OnePlus 8 5G स्मार्टफोनवर मिळणार 5 हजार रुपयांची सुट; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
OnePlus 8 5G (Photo Credit - Amazon)

Amazon Great Indian Festival Sale: 'अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अ‍ॅमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये OnePlus 8 5G स्मार्टफोनवरची किंमत उघड केली आहे. या सेलमध्ये OnePlus 8 5G च्या टॉप व्हेरिएंटवर 5 हजार रुपये तर एंट्री-लेव्हल व्हेरियंटवर 2 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. याशिवाय विक्रीदरम्यान, वनप्लस नॉर्ड आणि वनप्लस 8 प्रो 5 जी जुन्या किंमतीत उपलब्ध असतील.

यावर्षी एप्रिल 2020 मध्ये वनप्लस 8 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. Amazon ने या वनप्लस प्रीमियम फोनवर लॉन्च झाल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनंतर सूट जाहीर केली आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेले बेस व्हेरिएंट 41,999 रुपयांऐवजी 39,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच 8 जीबी रॅमसह टॉप-एंड व्हेरिएंट 5000 रुपयांच्या सवलतीत 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. वनप्लस 8 टी स्मार्टफोन 14 ऑक्टोबरला लाँच होणार आहे. वनप्लसच्या या फोनला मागील वनप्लस 8 च्या तुलनेत अधिक चांगला डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग स्पीड मिळणार आहे. (हेही वाचा - Apple कंपनी देतेय Apple TV Plus चे फ्री सब्सक्रिप्शन, फेब्रुवारी 2021 पर्यंत लाभ घेता येणार)

दरम्यान OnePlus 8 5G मध्ये 6.55 इंचाची फ्ल्युड एमोलेड स्क्रीन असून त्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. तसेच स्क्रीनची डेनसिटी 402 पीपीआय आहे. या स्मार्टफोनला सुरक्षेसाठी 3 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड फोन 10 बेस्ड ऑक्सीजनओएसवर चालतो. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय आहेत. फोनमध्ये 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज आहे. (Flipkart Big Billion Days Sale 2020: बिग बिलियन डे सेल पूर्वीच ग्राहकांना अवघ्या एक रूपयामध्ये वस्तू Pre-Book करता येणार; इथे जाणून घ्या या धमाकेदार ऑफर्स बद्दल!)

ग्राहकांना वनप्लसचा हा फोन 4300mAh बॅटरीसह मिळणार असून तो रॅप चार्ज 30 टी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. वनप्लस 8 5जी मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सरसह ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी, जीपीएस, ए-जीपीएस यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. वनप्लसचा हा फोन ग्लेशियल ग्रीन, इंटरस्टेलर ग्लो आणि ओनिक्स ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.