प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिअलमीने भारतात 16 जुलैला Realme 6 चा स्टोरेज वेरियंट लॉन्च केला आहे. यामध्ये 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. ऐवढेच नाही तर लोकप्रिय स्मार्टफोन Realme X2 चे ही नवे वेरियंट लॉन्च केले आहे. नव्या वेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिला आहे. हा स्मार्टफोन एकूण चार वेरियंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याची सुरुवाती किंमत 16,999 रुपये आहे.(Xiaomi च्या Mi TV Stick च्या साहाय्याने आता तुमच्या टीव्ही मध्ये पाहता येणार Netflix, Amazon Prime सारखे OTT अॅप्स; पाहा याची खास वैशिष्ट्ये)

कंपनीने आतापर्यंत Realme X2 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलच्या किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. परंतु येत्या 21 जुलैला रात्री 8 वाजता सेलसाठी युजर्सला उपलब्ध करुन देण्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी कंपनीकडून या स्मार्टफोनसाठी किंमतीबाबत घोषणा केली जाणार आहे. रिअलमी एक्स 2 च्या तीन स्टोरेज मॉडेल भारतात यापूर्वीपासून ओपन सेलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहेत. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास त्यात 4GB+64GB मॉडेलची किंमत 17,999 रुपये आणि 8GB+126GB मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन पर्ल ब्लू. पर्ल व्हाइट आणि पर्ल ग्रीन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे.(Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

रिअलमी एक्स2 मध्ये 2340X1080 पिक्सल स्क्रिन रेजोल्यूशसह 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Sanpdragon 730G प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 30W VOOC फ्लॅश चार्ज सपोर्टसह येणार आहे. मध्ये रियर कॅमेरा सेअप दिला आहे. यामध्ये 64MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा वाइड अँगल लेस आणि 2MP असे दोन अन्य लेंस दिले आहेत. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32MP आहे.