Goa Police | (File Image)

Abu Farhan Azmi Goa Fight: समाजवादी पक्षाचे (एसपी) महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांचा मुलगा अबू फरहान आझमी (Abu Farhan Azmi) आणि झिओन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, शाम यांच्यासह इतर अनेकांविरुद्ध गोवा पोलिसांनी (Goa Police) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर सार्वजनिक भांडण आणि उत्तर गोव्यातील कँडोलीम भागात शांतता भंग केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी (4 फेब्रुवारी) सांगितले. रेस्टॉरंट आणि उद्योजक अबू फरहान आझमी हे बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचे पती देखील आहेत. मुघल सम्राट औरंगजेब यांच्यावरील वक्तव्यावरून त्यांचे वडील, सपा आमदार अबू आझमी यांच्याबद्दल महाराष्ट्रात आगोदरच वाद सुरु आहे. या दरम्यानच गोव्यातील घटना घडली आहे.

गोव्यातील कँडोलिममध्ये वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंट्रोल रूमला सोमवारी रात्री 11.12 वाजता कँडोलिममधील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या भांडणाबाबत फोन आला. कँडोलिमचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, या भांडणादरम्यान अबू फरहान आझमी यांनी परवानाधारक बंदुक बाळगल्याचा उल्लेख केला होता. (हेही वाचा, Abu Azmi Retracts Statement On Aurangzeb: अबु आझमी यांच्याकडून औरंगजेब बद्दल केलेलं वक्तव्य मागे; 'चूकीचा अर्थ लावल्याने गोंधळ' झाल्याचं स्पष्टीकरण (Watch Video))

पोलिसांना दोन गट किरकोळ कारणावरून परस्परांशी जोरदार वाद घालू लागले. अल्पावधीतच दोन्ही गटांच्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. दोन्ही पक्षांना कँडोलिट पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि त्यांना औपचारिक तक्रार दाखल करण्याचा पर्याय देण्यात आला. दरम्यान, कोणत्याही गटाने तसे करण्याचा पर्याय निवडला नाही, असे पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा, Abu Azmi Aurangzeb Remark: 'औरंगजेब क्रूर नव्हता', अबू आझमी यांचे वक्तव्य; सर्वपक्षीयांकडून संताप, माफीची मागणी, गुन्हा दाखल .)

गोवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई

कोणीही वैयक्तिक तक्रार केली नसतानाही, कँडोलिट पोलिसांनी सार्वजनिक शांतता भंग करणे आणि भांडणात कथितरित्या सहभागी झाल्याबद्दल भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 194 अंतर्गत अबू फरहान आझमी आणि इतरांविरुद्ध राज्यस्तरीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पुष्टी केली की. अबू फरहान आझमी यांनी वैध शस्त्र परवाना आणि गोव्यात बंदुक बाळगण्याचा परवाना सादर केला. प्रोटोकॉलनुसार, संबंधित सर्व व्यक्तींना मापुसा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले, परंतु त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला, असे निवेदनात म्हटले आहे.