India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्हन स्मिथच्या खांद्यावर आहे. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा मोठा धक्का लागला आहे. विराट कोहली 84 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 226/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)