
Odisha Crime News: गुटखा () खाण्याचे व्यसन अतिरेकी प्रमाणात असलेल्या एका व्यक्तीने आपल्या वडिलांची केवळ 10 रुपयांसाठी हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे केवळ गुटखा (चघळण्याची तंबाखू) खरेदी (Odisha Gutkha Dispute) करण्यासाठी या व्यक्तीस पैसे हवे होते. जे वडिलांनी दिले नाहीत, म्हणून त्याने टोकाचे पाऊल उचलत वडिलांचा शिरच्छेद केला. ही घटना ओडिशा राज्यातील मयूरभंज (Mayurbhanj Murder Case) जिल्ह्यात घडली. धक्कादायक असे की, 40 वर्षांच्या या व्यक्तीने वडिलांचे शीर धडावेगळे केल्यानंतर ते हातात घेऊन चक्क पोलीस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले.
वडिलांवर धारधार शस्त्राने हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीस गुटखा खाण्याचे व्यसन होते. त्याचे वडील वृद्ध होते. त्याला गुटखा खाण्याची लहर आली आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने त्याच्या वृद्ध वडिलांकडे पैशांची मागणी केली. मात्र, वडिलांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यातून दोघांमध्ये वाद उद्भवला. वाद इतका विकोपाला गेला की, त्याने चक्क वडिलांवर धारधार शस्त्राने हल्ला केला. याच शस्त्राने त्याने वडिलांचा शिरच्छेद केला. धडावेगळे शीर घेऊन त्याने चक्क पोलीसस्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले. मृत व्यक्तीची ओळख पटली असून बैधर सिंग असेत्याचे नाव असून, तो 70 वर्षांचा आहे. (हेही वाचा, Odisha Shocker: ओडिशात एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल)
भीतीने आई पळाली
घटनेबाबत अधिक माहिती सांगताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या आईवडीलांसोबत मयूरभंज जिल्ह्यातील चंदुआ परिसरात राहात होता. आरोपी आणि वडिलांमध्ये सुरु असलेली हिंसक भांडणे पाहून आरोपीची आई आणि पीडिताची पत्नी असलेली महिला घटनास्थळावरुन पळून गेली. घाबरून गेलेल्या या महिलेने केवळ भीतीमुळे घटनास्थळावरुन पळ काढल्याचे अधिकारी म्हणाले. बारीपाडा उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) प्रवत मल्लिक यांनी घटनेच्या घटनाक्रमाला दुजोरा देत म्हटले आहे की, हा खून किरकोळ वादातून झाला. आरोपीच्या वडिलांनी गुटख्यासाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने तो संतापला. त्यातूनच त्याने वडिलांची हत्या केली.
पोलिस फॉरेन्सिक टीमसह गावात दाखल
आरोपीची मानसिक स्थिती, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याच्याकडून कथीतरित्या होणारा मादक पदार्थांच्या गैरवापराबद्दल यांबाबत अधिक चौकशी केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि अधिकारी साक्षीदारांचे जबाब घेत आहेत.