ST Bus | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) 3 मार्च पासून सुरू झाले आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 10 मार्च दिवशी 2025-26 चा राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये एसटी बस साठी आर्थिक उभारीच्या उद्देशाने विशेष पॅकेज मंजूर करावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. सध्या एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची अनेक देणी थकलेली आहेत.

थकीत देण्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्न वाढीवर सुद्धा परिणाम झाला आहे. सरकार कडून न प्राप्त झालेली गेल्यावर्षीची तुटीची रक्कम 1000 कोटी रुपये आहे.तर एसटी महामंडळाची आणि कर्मचाऱ्यांची मिळून अनेक देणी निधी अभावी थकली असून ही देणी चुकती करण्यासाठी साधारण 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची आवश्यकता आहे.

आर्थिक संकटातून संकटातून महामंडळाची सुटका करायची असेल तर सरकारकडून आर्थिक मदत देऊन एसटीला मदत केली पाहिजे असेही बरगे यांनी म्हंटले आहे. ST Bus Fare Hike: एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ; महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला .

एसटी सवलतीच्या प्रवाशामुळे तोट्यात?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे म्हटलं आहे. सध्या एसटी बस भाड्यामध्ये महिला प्रवाशांना 50% सूट मिळत आहे. तर 75 वर्ष पार केलेल्यांना मोफत प्रवासाची सोय आहे. आता ही सवलत कायम राहणार की मागे घेतली जाणार? हे पाहावं लागणार आहे.