Mi TV Stick (Photo Credits: Twitter)

सध्या लॉकडाऊन मध्ये नेटफ्लिक्स (NetFlix), अॅमेजॉन प्राईम (Amazon Prime) सारख्या OTT प्लॅटफॉर्मच वेडं लोकांमध्ये प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे अनेक चित्रपट आणि वेब सीरिज देखील याच माध्यमातून लोकांच्या भेटीला येत आहे. यामुळे टीव्हीपासून लोक थोडी दुरावत चालली आहेत. यासाठी शाओमी ने Mi TV Stick हे एक अत्याधुनिक डिवाईस लाँच केले आहे. याच्या माध्यमातून आता तुम्ही Netflix, Amazon Prime, Disney Hotstar+ सारखे अन्य OTT प्लॅटफॉर्मचा आनंद मोठ्या टिव्हीच्या स्क्रीनवर देखील घेऊ शकता. हा एक पोर्टेबल स्ट्रीमिंग डिवाईस आहे ज्याला HDMI पोर्टच्या माध्यमातून टीव्हीशी कनेक्ट केले जाऊ शकते.

शाओमीचा हा Mi TV Stick डिवाईस Google Assistant आणि Chromecast सह येतो. हा स्टिक ब्लूटुथ रिमोट कंट्रोल सह येतो. या स्टिकला शाओमीने 1080p वेरियंट सह जागतिक बाजारात 39.99 यूरो (जवळपास 3,400) लाँच केले आहे. हे डिवाईस भारतात लाँच कऱण्याबाबत योजना आखली जात असून लवकरच ही कंपनी अधिकृत माहिती देईल.

हेदेखील वाचा- Redmi नोट स्मार्टफोन खरेदी केल्यास युजर्सला Earphones मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर

Mi TV Stick याच्या खास वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा Amazon Fire TV Stick सारखाच आहे. या काळ्या रंगात उपलब्ध आहे. शाओमी ने यात क्वार्ड कोर सीपीयू सह 1GB रॅम आणि 8GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे. हा डिवाईस अॅनड्रॉईड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. Mi TV Stick ला कंपनीने Dolby Audio आणि DTS साउंड फॉरमेटसह लाँच केला आहे.

यात फुल एच डी 1080×1920p रिजोल्युशन लाँच केला आहे. या स्टिकच्या साहाय्याने यूजर्स आपल्या स्मार्टफोनमधील व्हिडिओज आणि फोटोज टिव्हीवर पाहू शकतात.