Redmi नोट स्मार्टफोन खरेदी केल्यास युजर्सला Earphones मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर
Redmi Note 8 Pro (Photo Credits-Twitter)

रेडमी (Redmi) या वर्षाच्या अखेर पर्यंत दोन नवे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करत आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने त्यांच्या Redmi K30 5G स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली होती. त्यानंतर 4G वर्जन मध्ये सुद्धा कपात केली होती. त्यानंतर आता कंपनीने रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनच्या किंमतीत सुद्धा घट केली होती. त्यानंतर आता रेडमी नोट 8 प्रो साठी कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा ग्राहकांना येत्या 15 जुलै पर्यंत घेता येणार आहे.(48 मेगापिक्सल असलेला Motorola One Vision Plus लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत)

शाओमी पहिल्यांदाच रेडमी नोट 8 प्रो सोबत इअरफोन फ्री देत आहे. ही एक मर्यादित कालावधीसाठी ऑफर असून 15 जुलै पर्यंत असणार आहे. रेडमी नोट 8 प्रो च्या 6GB+64GB वेरियंटवर ही ऑफर लागू करण्यात आली आहे. 6GB+128GB आणि 8GB+128GB वेरियंटवर यापुर्वी सारखीच डिस्काउंट किंमतीसह ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. परंतु या स्मार्टफोनवर कंपनी इअरफोन ऑफर करत नाही आहे.(Xiaomi कंपनीचा नवा आविष्कार! भारतात 14 जुलै ला लाँच करणार कार मध्ये हवा भरणारे Mi Portable Electric Air Compressor)

रेडमी नोट 8 प्रो मध्ये 1080 X 2340 पिक्सल रेजोल्युशनसह 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हिलिओ G90T एसओसी प्रोसेसर येणार आहे. ऑपरेटिंग सिस्टम बाबत बोलायचे झाल्यास तो अॅन्ड्रॉइड 9 Pie वर बेस्ड MIUI 10 OS वर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आणि दोन मेगापिक्सल कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. कंपनीने सुरुवातीला 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह लॉन्च केला होता. त्यानंतर फोन 156GB वर्जन लॉन्च केले होते. रेडमी नोट 8 सीरिज कंपनीचे स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंदीस पडले होते.