48 मेगापिक्सल असलेला Motorola One Vision Plus लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Motorola | (Photo Credits: Motorola)

मोटोरोला कंपनीने गेल्या वर्षात Moto G8 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर आता कंपनीने याचे रिब्रँन्डेड वर्जन Motorola One Vision Plus बाजारात लॉन्च केला आहे. खिशाला परवडणाऱ्या रेंजमध्ये हा स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये युजर्सला 48 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 4000mAh बॅटरी दिली जाणार आहे. कंपनीने हा मिडल ईस्ट देशांमध्ये लॉन्च केला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा लिस्ट करण्यात आला आहे.

मोटोरोला वन व्हिजन प्लस हा स्मार्टफोन ग्राहकांना 14,320 रुपयात खरेदी करता येणार आहे. यासाठी कंपनीने क्रिस्टल पिंक आणि कॉस्मिक ब्लू या दोन कलर वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर लगेच ग्राहकांना सेलसाठी उपलब्ध करुन दिला आहे.(Motorola G8 Power Lite Smartphone Sale Today: फ्लिपकार्टवर सेलला सुरुवात; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

यामध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रिन रेजोल्युशन 2280X1080 पिक्लस आहे. तर 19:9 मॅक्स व्हिजन अस्पेक्ट रेश्यो आणि वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. या स्मार्टफोनसाठी 1.8GHz Octa-Core Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर दिला आहे. यामध्ये 4जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला असून तो युजर्सला मायक्रोएसडी कार्डच्या आधारे 512 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.(Poco M2 Pro अखेर भारतात लाँच; जबरदस्त कॅमेरा फिचर्स आणि बॅटरी लाईफ असलेल्या या स्मार्टफोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये)

फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये क्वाड रियर सेटअप दिला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 5MP डेप्थ सेंसर, 16MP अल्ट्रा वाइड सेंसर आणि एक मायक्रो सेंसर दिला आहे. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. Android 9.0 Pie OS वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 15W टर्बो चार्जर सपोर्टसह 4000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हीसाठी 4G VoLTE सपोर्टसह ब्लुटूथ 5.0, जीपीएस, युएसबी टाइप सी पोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट दिला आहे. या फोनचे वजन 188 ग्रॅम आणि साइज 75.83 X 9.09 mm आहे.