Poco M2 Pro अखेर भारतात लाँच; जबरदस्त कॅमेरा फिचर्स आणि बॅटरी लाईफ असलेल्या या स्मार्टफोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये
Poco M2 Pro (Photo Credits: Twitter)

गेल्या अनेक दिवसापासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला Poco M2 Pro स्मार्टफोन आज अखेर भारतात (India) लाँच झाला आहे. या नवीन Poco स्मार्टफोन ला होल पंच डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. भारतात लाँच झालेला Poco M2 Pro हा पोकोचा तिसरा फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि RAW मोड सारखे कॅमेरा मोड देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन प्रकारात उपलब्ध केला आहे. ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB रॅम आमि 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहेत.

Poco M2 Pro च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ची किंमत 13,999 रुपये, 6GB रॅम आमि 64GB स्टोरेज 14,999 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याची पहिली फ्लॅश सेल 14 जुलै ला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आली आहे. हा फ्लॅश सेल ऑनलाईन साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) होईल. आउट ऑफ द ब्लू, ग्रीन एंड ग्रीनर आणि टू शेड्स ऑफ ब्लैक या तीन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा- Poco M2 Pro India Launch Set For Tomorrow: पोको एम 2 प्रो उद्या भारतात होणार लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.67 इंचाची फुल एचडी+(1,080x2,400p) डिस्प्ले देण्यात आली आहे. तसेच 20:9 आस्पेक्ट रेशियो और कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर यात 4 रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा सेकेंडरी कॅमेरा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. Poco M2 Pro मध्ये 5MP चा मॅक्रो शूटर आणि 2MP चा डेप्थ सेंसर सुद्धा दिला गेला आहे. सेल्फी साठी 16MP चा सेंसर देण्यात आला आहे. जो नाइट मोडला सुद्धा सपोर्ट करतो.

याच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर 128 जीबी UFS 2.1 स्टोरेज देण्याती आली आहे. ज्याला तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 512GB पर्यंत वाढवू शकतो.

कनेक्टिव्हिटी साठी 4G VoLTE, वायफाय 802.11 एसी, ब्लूटुथ 5.0, GPS/A-GPS, युएसबी टाइप-सी आणि 3.5MM हेडफोन जॅक देण्यात आला आहे. तसेच यात 5020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.