मोटरोला या स्मार्टफोन ब्रँडने Moto G8 Lite हा स्मार्टफोन गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च केला. या बजेट स्मार्टफोनचा ऑनलाईन सेल पुन्हा एकदा सुरु होत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असणारे फिल्पकार्टवरुन या स्मार्टफोनची खरेदी करु शकतात. आज दुपारी 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात होईल. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा व्हिजन एचडी+ डिस्प्ले आहे. तसंच यात 4GB रॅम, 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Moto G8 Power Lite हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. रॉयल ब्लू आणि आर्कटीक ब्लू. यात 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले वॉटरड्राप स्टाईल नॉच सह देण्यात आला आहे. याचे HD+ रिजोल्यूशन 720x1600 पिक्सलचे असून याचा आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे. यातील चिपसेट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. यात मेमरी वाढवण्यासाठी तुम्ही मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये मीडियाटेकचा Helio P35 SoC प्रोसेसर असून त्याचा स्पीड 2.3GHz इतका आहे.
Moto G8 Lite या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला असून 16MP चा प्रायमरी कॅमेरा तसंच 2MP ची माक्रो आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात ड्युल कॅमेरा बोहेक, फेस ब्युटी, HDR, गुगल लेन्स आणि इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा स्नॅपर कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 10W चे रॅपिड चार्जिंग देण्यात आलं आहे. तसंच हा स्मार्टफोन Android 9 Pie वर काम करतो. Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2, GPS, a micro USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांच्यासह काही खास फिचर्स देण्यात आले आहेत.