दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) यांनी त्यांच्या युजर्ससाठी खिशाला परवडेल असा एक स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने त्यांनी गेल्या वर्षात लॉन्च केलेल्या Galaxy M सीरिज अंतर्गत उतरवला आहे. Samsung Galaxy M01s कंपनीने भारतात 9,999 रुपयांत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोन Galaxy M01 चा सक्सेसर आहे. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. तसेच फ्रंट पॅनलसाठी फुल एचडी वॉटरड्रॉप किंवा डॉट नॉच फिचर असणारा प्लस डिप्ले दिला गेला आहे.(Realme C11 Launched in India Today: रिअलमी सी11 स्मार्टफोन केवळ 7,499 रुपयांमध्ये भारतात लॉन्च)
Samsung Galaxy M01s स्मार्टफोनसाठी फक्त एकच स्टोरेज ऑप्शन म्हणजे त्यासाठी 3GB RAM+32GB सह उपलब्ध करुन दिला आहे. याची टक्कर Xiaomi Redmi नंबर सीरिज आणि Realme C सीरिजच्या बजेट स्मार्टफोनसह होणारी ठरणार आहे. फोन ई-कॉमर्स वेबसाईट किंवा ई-स्टोर आणि ऑफलाईन रिटेल स्टोरच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.(Samsung कंपनीचा 'हा' फ्रिज खरेदी केल्यास ग्राहकांना 39 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर)
गॅलेक्सी एम01s स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यासाठी त्यासाठी 6.2 इंचाचा फुल एचडी प्ल TFT Infinity V डिस्प्लेसह येणार आहे. फोन MediaTek Helio P22 ऑक्टाकोर प्रोसेसरसह येणार आहे. फोनसाठी इंटरनस मेमोरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित OneUI वर चालणार आहे. फोनमध्ये कॅमेरा 13MP+2MP ड्युअल रियर कॅमेरासह येणार आहे. सेल्फीसाठी युजर्सला 8MP कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 4,000mAh ची बॅटरी आणि USB Type C सपोर्ट देण्यात आले आहे.