Realme C11 Launched in India (Photo Credits: Realme India)

कोरोना विषाणूमुळे जगभरातील निम्म्याहून अधिक देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. ज्यामुळे ,स्मार्टफोन कंपन्यांना मोठा फटका बसला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक देशात लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळे अनेक कंपन्या आपला स्मार्टफोन बाजारात घेऊन येऊ लागल्या आहेत. यातच रिअलमी कंपनीचा रिअलमी सी 11 स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. रिअलमी सी 11 या नवीन स्मार्टफोन किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन रंगात उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन 22 जुलैपासून फ्लिपकार्टवरुन फोन खरेदी करता येणार आहे.

रिअलमी कंपनीचा रिअलमी सी 11 हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आला होता.या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5 हजार एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही देण्यात आले आहे.  रियलमी सी11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. हे देखील वाचा- Poco M2 Pro First Sale Today: आज दुपारी 12 पासून Flipkart वर सेलला सुरुवात; जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि ऑफर्स

ट्वीट-

 

याआधी रिअमी कंपनीच्या नार्जो सीरिजमधील नार्जो 10 ए हा स्मार्टफोन 10 जुलै रोजी ‘फ्लॅश सेल’मध्ये उपलब्ध करुन दिला होता. या स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. फ्लिपकार्ट, अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक देण्यात आला होता. याशिवाय नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही दिला होता. तसेच, रिअलमीच्या वेबसाइटवर या फोनसाठी एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आधी एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होता. पण आता हा फोनही दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,499 रुपये तर, 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. तसेच हा स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.