SpaceMax Family Hub Refrigerator (Photo Credits-Twitter)

दक्षिण कोरियाची कंपनी सँमसंग (Samsung) यांनी भारतात त्यांच्या Internet of Things प्रोक्ट्सची रेंज वाढवत SpaceMax Family Hub Refrigerator लॉन्च केला आहे. याची किंमत जवळजवळ 2,19,900 रुपये आहे. परंतु ग्राहकांना हा फ्रिज सध्या 1,96,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये काही शानदार फिचर्स दिले असून याच्या खरेदीवर कंपनी ग्राहकांना 37,999 रुपयांचा सँमसंग गॅलेक्स नोट 10 (Samsung Galaxy Note 10) हा स्मार्टफोन फ्री देणार आहे. ऐवढेच नाही तर फ्रिज 13 ते 26 जुलै दरम्यान प्री-बुक केल्यास त्यासाठी 9 हजार रुपयांचा कॅशबॅकचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

प्रीमियम ब्लॅक मॅट फिनिशिंग असलेला हा फ्रिजमध्ये 657 लीटरचा स्टोरेज देण्यात आला आहे. त्याचसोबत हा फ्रिज घरातील अन्य स्मार्ट होम अप्लायंसेस सोबत कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये होम कंट्रोल आणि फॅमिली हब स्क्रिन सारखे फिचर्स दिले असून ग्राहकांना कनेक्ट करण्यात आलेल्या अप्लायंसेसवर कंट्रोल आणि मॉनिटरिंग करता येणार आहे. रेफ्रिजरेटरची आणखी एक खासियत म्हणजे याच्या फुड मॅनेजमेंट फिचरच्या मदतीने फ्रिजचा दरवाजा खुला न करता आतमध्ये ठेवण्यात आलेल्या गोष्टी तपासून पाहता येणार आहे.(Reon Pocket Wearable Air Conditioner : सोनी कंपनीने विक्रीसाठी खुला केला वेअरेबल एसी; जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्य!)

 

SpaceMax Family Hub Refrigerator (Photo Credits-Twitter)

रेफ्रिजरेटरसाठी 21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रिन दिला आहे. हा 15 वॅट स्पीकर्ससह येणार आहे. युजर्सला या फ्रिजच्या सहाय्याने त्यांचा स्मार्टफोन किंवा टीव्ही स्क्रिन सुद्धा बनवता येणार आहे. रेफ्रिजरेटरच्या फॅमिली कनेक्शन म्हणून देण्यात आलेल्या फिचरच्या मदतीने फोटो शेअर करण्यासह टेक्स मेसेज सुद्धा पाठवता येणार आहेत. रेफ्रिजरेटरमध्ये ब्लुटुथ आणि Bixby वॉइस असिस्टंट सपोर्ट ही दिला आहे.(Xiaomi कंपनीचा नवा आविष्कार! भारतात 14 जुलै ला लाँच करणार कार मध्ये हवा भरणारे Mi Portable Electric Air Compressor)

Spacemax Family Hub Refrigerator: Samsung चा 'हा' फ्रिज खरेदी केल्यास ३८ हजारांचा मोबाईल फ्री - Watch Video

फ्रिजसाठी ऑलराउंड कुलिंग देण्यात आले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, याची डिजिटल इन्वर्टर टेक्नॉलॉजी 50 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करते. फ्रिजमध्ये घाण वास येऊ नये म्हणून यासाठी खास डिओडराइजिंग फिल्टरचा वापर केला असून बिल्ट-इन-कार्बन फिल्टरच्या मदतीने सातत्याने हवा पास करतो. रेफ्रिजरेटरचे फिचर्स कंन्ट्रोल करण्यासाठी सँमसंगचा स्मार्ट थिंग्स या अॅपचा वापर करता येणार आहे.