Virat Kohli And KL Rahul (Photo Credit - X)

India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखुन पराभव केला आहे. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक घेतली आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि सर्व सामने जिंकले. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने सहा विकेट गमावून 48.1 षटकात लक्ष गाठले.

प्रथम फलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांत सर्वबाद होण्यापूर्वी 264 धावा केल्या. स्मिथने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. अ‍ॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 39 धावांचे योगदान दिले. बेन द्वारशुइसने 19 धावांची खेळी केली. 29 धावा करून लाबुशेन बाद झाला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी व्यतिरिक्त, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि संघाचे दोन्ही सलामीवीर अवघ्या 43 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी मिळून डावाची जबाबदारी घेतली. टीम इंडियाने 48.1 षटकांत सहा विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी, महान फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान, विराट कोहलीने 98 चेंडूत पाच चौकार मारले. विराट कोहली व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 45 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून स्टार गोलंदाज अॅडम झांपा आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अॅडम झांपा आणि नॅथन एलिस यांच्याव्यतिरिक्त बेन द्वारशुइस आणि कूपर कॉनोली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी टीम इंडिया आणि दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघात खेळला जाईल.