Realme कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला 5 कॅमेऱ्यासह मिळणार दमदार फिचर्स
Realme X5 (Photo Credits-Twitter)

Realme कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Realme X50 स्मार्टफोनची गेल्या काही काळापासून सर्वजण वाट पाहत होते. कंपनीचा या वर्षातील हा पहिला स्मार्टफोन असून रियअलमी X2 Pro च्या नंतर प्रीमियम सेंगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे. रियलअमी X50 हा स्मार्टफोन 26 हजार रुपयांना खरेदी करता येणार आहे. या मॉडेलसाठी 4G वेरियंट सादर करण्यात आलेला नाही.

रियअलमी दोन रंगामध्ये असुन त्यात एक ग्लेशिअर (Sky Blue) आणि दुसरा पोलर (Voilet) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. चायना मध्ये या स्मार्टफोनची विक्री 9 जानेवारी पासून सुरु होणार आ हे. असे सांगितले जात आहे की, रियअलमी एक्स 50 याचे फिचर्स डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Readmi K30 5G सारखेच आहेत. कॅमेरासेटअप व्यतिरिक्त अन्य फिचर्समध्ये बदलाव करण्यात आलेला नाही.(Realme 5i भारतात 9 जानेवारीला होणार लॉन्च; Flipkart वर टीजर लॉन्च)

स्मार्टफोनच्या डिस्प्लेबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.57 इंचाचा Full HD+डिस्प्ले देण्यात आला आहे. रियअलमी एक्स 50 चा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अॅंगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आमि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यात 20X झूम आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. सेल्फी काढण्यासाठी युजर्सला 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी 4200mAh ची देण्यात आली असुन कंपनीने असा दावा केला आहे की ती 70 टक्के चार्जिंग 30 मिनिटात होणार आहे.