Realme 5i भारतात 9 जानेवारीला होणार लॉन्च; Flipkart वर टीजर लॉन्च
Realme 5i | | (Photo credit: realme.com )

गेल्या काही काळापासून स्मार्टफोन विश्वात चर्चेत असलेला रियलमी Fi (Realme 5i) अखेर भारतात लॉन्च होणार आहे. Realme 5i (रियलमी Fi) च्या भारतातील लॉन्चिंगची तारीखही (Realme 5i Launch Date in India) नक्की झाली आहे. या फोनचे वायफाय सर्टिफिकेशन साईट ते Geekbench वर लिस्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रियलमी वियतनाम या फेसबुक पेजवर हा स्मार्टफोन येत्या 6 जानेवारीला भारतात लॉन्च होणार असल्याचा टीजर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर रियलमीने अधिकृतपणेच हे म्हटले आहे की, रियलमी ५ आय हा स्मार्टफोन येत्या 9 जानेवारी या दिवशी भारतात लॉन्च केला जाईल. मात्र, रियलमीने अद्याप हे स्पष्ट केले नाही की, हो फोन कोणत्या मार्केटमध्ये सादर होत आहे.

Realme Mobiles ट्विट करत म्हटले आहे की, रियलमी 5 आय 9 जानेवारी या दिवशी लॉन्च होईल. लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनी या कार्यक्रमाचे सोशल चॅनल आणि अधिकृत बेवसाईट आदी माध्यमांतून लाईव्ह स्ट्रीम केले जाईल. ट्विटमध्ये एक एका मायक्रोसाईटचाही उल्लेख करण्यात आला आहे. या साईटवर फओनचे काही स्पेसिफिकेशन सांगण्यात आले आहेत. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेट यांनीही ९ जानेवारीला हा फोन भारतात लॉन्च करण्यात येईल असे म्हटले आहे.

Realme 5i चा टीजर फ्लिपकार्टवरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला रियलमी व्हिएतनाम ने आपल्या फेसबुक पेजवर दावा केला आह की, हा फोन ६ जानेवारीला लान्च केला जाईल आणि तो ब्लू आणि ग्रीन कलर व्हेरिएमटमध्ये उपलब्ध असेन. (हेही वाचा, Xiaomi स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल, 'हे' महत्वाचे फिचर वापरता येणार नाही)

दरम्यान, रियलमी ५ आयचे काही स्पेसिफिकेशन मायक्रोसाइटवर लिस्ट केले गेल्याने सार्वजिक झाले आहेत. हे स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरी, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप, 6.5 इंच मिनी ड्रॉप डिस्प्ले आणि एक 'पॉवरफूल', 'स्ॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत येणार आहे, असे समजते. दरम्यान, हा फोन या आठवड्यातच लॉन्च होणार असून, त्याची किंमत आणि तो कोठे मिळेल याची अधिकृत माहिती लवकच पुढे येणार आहे.