Angry Babar Azam Smashes Boundary Cushion Video: सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) शुक्रवारी पार पडलेल्या सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यातील 'सिडनी डर्बी' सामन्यात एक हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्ह स्मिथ यांच्यात खेळपट्टीवर वादाची ठिणगी पडली. या वादाचा परिणाम बाबरच्या विकेटमध्ये झाला, ज्यामुळे संतापलेल्या बाबरने मैदानाबाहेर जाताना आपली बॅट सीमा रेषेवरील कुशनवर (Boundary Cushion) जोरात आदळली.
141 धावांची भागीदारी, पण ताणतणाव कायम सिडनी सिक्सर्सकडून खेळताना बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सलामीला येत 141 धावांची विक्रमी भागीदारी रचली. मात्र, ही भागीदारी सुरू असतानाच स्ट्राईक रोटेशनवरून (धावा घेण्यावरून) दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत होते. सामन्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर स्मिथने एक धाव घेण्यास नकार दिला, ज्यामुळे बाबर आझम कमालीचा नाराज झाला.
धाव नाकारली अन् विकेट गेली स्मिथच्या या निर्णयामुळे बाबरचा लक्ष विचलित झाले आणि पुढच्या काही वेळातच तो 47 धावांवर बाद झाला. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना बाबरने आपला राग अनावर केला. त्याने बाउंड्री कुशनवर बॅट मारून आपली नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रिकेट विश्वात या दोन मोठ्या खेळाडूंमधील वादाची चर्चा रंगली आहे.