Maghi Ganpati Invitation Card In Marathi Template Free Download

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाचा जन्मोत्सव, म्हणजेच 'माघी गणेश जयंती' (Maghi Ganesh Jayanti 2026) यंदा २२ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. पूर्वी हा उत्सव प्रामुख्याने मंदिरांपुरता किंवा कोकण पट्ट्यात मर्यादित होता. मात्र, गेल्या काही वर्षांत मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या शहरांमध्येही माघी गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप मोठे झाले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये दीड किंवा पाच दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच आता माघी गणपतीचे स्वरूपही व्यापक होत असून, भाविकांनी आतापासूनच निमंत्रण पत्रिका आणि उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

माघी गणेश जन्मोत्सवाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

पंचांगानुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा ही तिथी २२ जानेवारी रोजी येत आहे.

चतुर्थी तिथी प्रारंभ: 22 जानेवारी 2026, पहाटे 02:47 वाजता.

चतुर्थी तिथी समाप्ती: 23 जानेवारी 2026, पहाटे 02:28 वाजता.

पूजेचा मुहूर्त: दुपारी 11:29 ते 1:37 पर्यंत (मध्यान्ह काळ).

माघी गणेश जयंती निमंत्रण पत्रिका

आजकाल व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या युगात डिजिटल निमंत्रण पत्रिकांना (Ganesh Jayanti Digital Invitation Cards) मोठी मागणी आहे. अनेक भक्त आता 'ई-कार्ड्स'च्या माध्यमातून नातेवाईकांना आमंत्रण देत आहेत. यामध्ये बाप्पाचे गोंडस फोटो, मंत्र आणि निमंत्रकाचे नाव अशा स्वरूपात आकर्षक डिझाइन्स उपलब्ध आहेत.

माघी गणेश जयंती मराठी निमंत्रण पत्रिकेचा नमुना (Sample Text)

जर तुम्ही घरी माघी गणेश जयंती निमित्त पूजेचे आयोजन करत असाल, तर खालीलप्रमाणे मजकूर वापरू शकता:

॥ श्री गणेशाय नम: ॥

सप्रेम नमस्कार, आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'माघी गणेश जयंती' निमित्त बाप्पाचे आगमन आणि पूजन होणार आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन बाप्पाच्या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

दिनांक: गुरुवार, २२ जानेवारी २०२६. वेळ: सकाळी १०:०० वाजल्यापासून. पत्ता: [तुमचा पत्ता येथे लिहा] निमंत्रक: [तुमचे नाव] आणि समस्त परिवार.

माघी गणेश जयंती 2026 आमंत्रण पत्रिका

यावर्षी गणेश जयंती गुरुवारी आल्यामुळे भाविकांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. या दिवशी गणपतीला 21 दुर्वा आणि 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्त्व असते.