मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज, १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडत आहे. सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले असून, पहिला निकाल प्रभाग १८३ मधून काँग्रेसच्या आशा काळे यांच्या रूपाने जाहीर झाला. दुपारपर्यंत मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील चित्र स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गजांनी आपले गड राखले आहेत.
यंदाची निवडणूक प्रामुख्याने महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) यांच्यात विभागली गेली होती. सुरुवातीच्या कलानुसार, उपनगरात भारतीय जनता पक्षाने आपली पकड मजबूत ठेवली आहे, तर दक्षिण मुंबईत शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.
विजयी उमेदवारांची प्राथमिक यादी (काही महत्त्वाचे प्रभाग)
मतमोजणी केंद्रांवरून हाती आलेल्या माहितीनुसार, खालील उमेदवारांनी आपापल्या प्रभागात विजय मिळवला आहे:
प्रभाग 183 (धारावी): आशा काळे (काँग्रेस)
मानखुर्द MIM एक सीट जिंकली आहे.
विजयी उमेदवारांची यादी येथे वाचा
टीप: ही अधिकृत यादी नाही, अंतिम निकालासाठी अधिकृत वेबसाइट पहा.
मतदानाची टक्केवारी आणि चुरस
यावेळच्या निवडणुकीत मुंबईत सरासरी ५५ ते ५८ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढल्याने निकालांबाबत मोठी उत्सुकता होती. विशेषतः मराठी बहुल आणि झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) असलेल्या भागांमध्ये मतदारांनी कुणाला कौल दिला, यावरच पालिकेची सत्ता कोणाकडे जाणार हे अवलंबून आहे.