Xiaomi स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल, 'हे' महत्वाचे फिचर वापरता येणार नाही
Representational Image | (Photo Credits: File Photo)

शाओमीचे स्मार्टफोन त्यांच्या कस्टम इंटरफेस एमआययूआयवर काम करतात. एमआय 9 टी प्रो वगळल्यास कंपनीच्या उर्वरित फोनमध्ये एमआययूआय इंटरफेस आहे आणि अ‍ॅप्सपासून नोटिफिकेशन्सपर्यंत वेगळा अनुभव मिळतो. पण आता एक मोठा बदल होणार आहे. शाओमीने त्यांच्या फोरम मध्ये असे सांगितले की, Mi 9T Pro नंतर लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये गुगल डायलर (Google Dialler) आणि गुगल मेसेजेस पेक्षा कमी असणार आहे.

गिजमोचाइना यांनी दिलेल्या वृत्तानुसार शाओमीमध्ये हा बदल जगभरात लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये होणार आहे. म्हणजेच चायना यांच्या बाहेरील शाओमीचे जेवढे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत त्यात गुगल मेसेज आणि डायलर दिले जाणार आहे. हा निर्णय कंपनीने स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.(Year Ender 2019: या वर्षातील सर्वाधिक Hit ठरलेले 'Top 5' Apps)

तर चीनी कंपनी शाओमीच्या स्मार्टफोनला भारतात अधिक पसंती दर्शवली जात आहे. यातच शाओमी कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन नोट 10 (Xiaomi Note 10) आणि नोट 10 प्रो (Xiaomi Note 10 Pro) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. शाओमी कंपनीच्या चाहत्यांना हे दोन्ही स्मार्टफोन येत्या नवीन वर्षात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये खास वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. शाओमी नोट 10 आणि नोट 10 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन अनेकांना पसंत येतील, अशी आशा कंपनी करत आहे.शाओमी कंपनीचा भारतीय बाजारात दाखल झाल्यापासून मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. इतर कंपनीच्या तुलनेत शाओमी कपंनीचे स्मार्टफोन अधिक स्वस्त असतात. यामुळे शाओमीच्या कंपनीकडे अनेकजण आकर्षित झाले आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शाओमी कंपनीने एमआय 10 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होता. एमआय नोट प्रोची स्मार्टफोनची किंमत भारतात जवळपास 50 हजार ते 55 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.