Top 5 Apps (Photo Credits: Twitter)

Top 5 Apps in Year 2019: यंदाचे वर्ष राजकीय, कला, क्रिडा, टेक्नोलॉजीच्या जगातही खूपच क्रांती घडविणारे होते. 2019 मध्ये अनेक खळबळजनक घडामोडी झाल्या. यात टेक्नोलॉजीच्या जगातही अनेक नवनवीन बदल झाले. काही नवीन गॅजेट्स आले त्यात मोबाईल्स, कॅमेरा, ब्लूटुथ यांसारख्या डिवायसेस ने अक्षरश: धुमाकूळ घातला. तर दुसरीकडे काही अॅप्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. यात UTS, NetFlix, Helo, Google Pay आणि TikTok यांसारख्या अॅप्सने अवघ्या तरुणाईला वेडं लावलं. Tiktok अॅप ने तर न केवळ तरुणांना पण लहानग्या चिमुरड्यांना सुद्धा अक्षरश: वेडं लावले. त्यांचे बरेचसे व्हिडिओ Tiktok च्या माध्यमातून सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले.

पाहूयात 2019 मधील हे टॉप '5' अॅप्स:

1) Tiktok

टिकटॉक हा अॅप बिजींगच्या ByteDance कंपनीने बनवलेला अॅप आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांवर किंवा डायलॉगवर तुमचे छोटे व्हिडिओ बनवू शकता. काही लोक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंजेस देऊ लागले.

हेदेखील वाचा- Year Ender 2019: आकर्षक डिझाईन्स आणि दमदार फिचर्स असलेले या वर्षातील 'Top 5' स्मार्टफोन्स

2) NetFlix

वेबसीरिज हा प्रकार सध्या सोशल मिडियावर इतका धुमाकूळ घालत आहे. या वेबसीरिजला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नेटफ्लिक्स एक उत्तम माध्यम बनले.

3) Google Pay

डिजिटल पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गुगल पे एक उत्तम माध्यम बनले. या अॅपच्या माध्यमातून झटपट ऑनलाईन बँक व्यवहार, शॉपिंग, बिल भरणे अगदी सोपे झाले.

हेदेखील वाचा- Year Ender 2019: बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केलेले बॉलिवूडचे Top 10 चित्रपट, येथे पाहा यादी

4) Helo

Helo हे भारतातले बेस्ट सोशल अ‍ॅप आहे. 50,000,000+अधिक वापरकर्त्यांसह विनामूल्य डाउनलोड चित्रे/व्हिडिओज शेअरिंग, चॅटिंग आणि मित्र बनविण्याकरिता एक उत्तम भारतीय सामाजिक अ‍ॅप आहे.

5) UTS

डिजिटल माध्यमाद्वारे कॅशलेस पद्धतीने रेल्वे तिकिट काढणे सोपे करण्यासाठी UTS अॅप खूपच फायदेशीर ठरले. हे सरकारी अॅप असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त रक्कम न जाता रेल्वे तिकिटाची मुळात जी किंमत ठरविण्यात आली आहे तेवढीच रक्कम वापरु जाऊ लागले. यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लावण्यापासून रेल्वे प्रवाशांची सुटका झाली.

वरील अॅप्सने सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घालता. तसेच डिजिटल युगात एक नवीन क्रांती आणली असेही म्हणायला हरकत नाही. यात काही अॅप्सने तरुणांच्या मनावर वाईट परिणाम झाले असतील तर काही अॅप्सने लोकांना महत्त्वाची माहिती प्रदान केली.