Year Ender 2019: बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केलेले बॉलिवूडचे Top 10 चित्रपट, येथे पाहा यादी
Box Office Movie 2019 (Photo Credits: Instagram)

Year Ender 2019 SuperHit Movies: 2019 हे वर्ष संपूर्ण देशासाठी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठी खूपच रोमांचित करणारा आणि आश्चर्याचे धक्के देणारे होते. या वर्षात राजकीय, मनोरंजन, क्रिडा, कला अशा क्षेत्रांत ब-याच घडामोडी घडल्या. बॉलिवूडसाठी हे वर्ष तसे खास होते. यावर्षी आलेल्या अनेक हिंदी चित्रपटांनी बॉलिवूडला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले. यात काही चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले तर काही सपशेल आपटले. मात्र यावर्षीही वेगळ्या विषयाचे, वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने सिनेरसिकांनीही या अनोख्या चित्रपटांची मेजवानी मिळाली. उरी: द सर्जिकल स्ट्राईक, भारत, मिशन मंगल हे त्यातीलच काही निवडक चित्रपट.

या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही तितकाच धुमाकूळ घातला. यंदाचे बॉलिवूड चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही तितकेच दमदार होते. पाहूयात Wikipedia नुसार बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केलेले 2019 मधले Top 10 चित्रपट:

1) वॉर (War): 474.79 कोटी

2) कबीर सिंग (Kabir Singh): 379.02 कोटी

3) उरी: द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike): 342.06 कोटी

4) भारत (Bharat): 325.58 कोटी

5) मिशन मंगल (Mission Mangal): 290.11 कोटी

6) हाऊसफुल 4 (Housefull 4): 279.11 कोटी

7) गली बॉय (Gully Boy): 238.16 कोटी

8) टोटल धमाल (Total Dhamaal): 228.27 कोटी

9) छिछोरे (Chhichhore): 212.67 कोटी

10) सुपर 30 (Super 30): 208.93 कोटी

हेदेखील वाचा- Year Ender 2019: भारतरत्न लता मंगेशकर ते बेबी डॉल सनी लिओनी, हे आहेत ट्विटर वर ट्रेंड झालेले Top 10 Female Twitter Handles

हे होते टॉप 10 हिंदी चित्रपट ज्यांनी बॉक्स ऑफिसवर केली सर्वात जास्त कमाई आणि तोडले सारे रेकॉर्ड्स. 2019 च्या सरते शेवटी या वर्षातील अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही अशाच हटके स्टोरीज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी लेटेस्टली मराठी अवश्य पाहा.