Year Ender 2019: आकर्षक डिझाईन्स आणि दमदार फिचर्स असलेले या वर्षातील 'Top 5' स्मार्टफोन्स
Best Smartphones in 2019 (Photo Credits: File)

Top 5 Smartphones in 2019: हे वर्ष डिजिटल जगतात विशेषत: स्मार्टफोन जगतात उल्लेखनीय असे वर्ष होते. या वर्षी स्मार्टफोन्सच्या अनेक नामांकित कंपन्यांना आपले एकाहून एक सरस आणि दमदार फिचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँच केले. यात काही महागडे स्मार्टफोन्स तर स्वस्त बजेट स्मार्टफोन्स लाँच झाले. यात आयफोन, सॅमसंग, विवो, शाओमी, रियलमी या कंपन्यांनी जबरदस्त फिचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँच केले. या स्मार्टफोन्सची ग्राहकांमधील असलेली लोकप्रियता हे त्यांच्या दमदार विक्रीमधून दिसून आली. जबरदस्त कॅमेरा, उत्कृष्ट डिस्प्ले, बॅटरी लाईफ यामुळे हे स्मार्टफोन्स मोबाईल विश्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

मोबाईल जगतात आयफोन हा नेहमीच अग्रस्थानी राहिला असला तरी सर्वांनाच विशेषत: सर्वसामान्यांना तो परवडण्यासारखा नसल्याने बरेच लोक अन्य ब्रँड्सकडे वळाले. त्यात रेडमी, विवो, रेडमी यांसारख्या बजेट स्मार्टफोन्सने आयफोन जबरदस्त टक्कर दिली. पाहूयात 2019 मधील भन्नाट फिचर्स असलेले 'Top 5' स्मार्टफोन्स:

1) iphone 11

आयफोन 11 मध्ये विशेषतः 6.1 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आली आहे . सोबतच यामध्ये 12 मेगापिक्सेल क्षमतेचे दोन कॅमेरा दिले आहेत. यातील एक कॅमेरा हा वाईड तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड स्वरूपात वापरण्यात आला आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य असे की यातून तुम्ही 4K दर्जाचे व्हिडीओ शूट करू शकता. तसेच सेल्फी कॅमेऱ्यासाठी देण्यात आलेले खास स्लो मोशन फीचर व जुन्या मॉडेलहून अधिक काळ टिकणारा बॅटरी बॅकअप हा फोनला खास बनवतो. आयफोन 11 हा सहा नव्या रंगामध्ये लाँच झाला असून याची सुरुवातीची किंमत ही 699 डॉलर इतकी म्हणजेच 64,894 रुपये इतकी आहे. Vivo U20: बॅटरी, फास्ट चार्जिंग, डिस्प्ले, कॅमेरा यांसारख्या दमदार फीचर्स चा नवा स्मार्टफोन आज भारतात झाला लाँच; पहा काय आहे किंमत

2) Samsung Galaxy S10

Samsung Galaxy S10 मध्ये 6.1 इंचाची डिस्प्ले देण्यात आली असून 8 जीबी रॅम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सॅमसंग एस 10 मध्ये डुअल लेन्स कॅमेरा दिला आहे. तसेच 10 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 10 ची किंमत 899.99 डॉलर म्हणजे 63,900 रुपये आहे.

3) Vivo U20

याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट देण्यात आले आहे. याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 18W ड्यूल इंजिन फास्ट चार्ज फिचर देण्यात आले आहे. तसेच याच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात U20 ला 6.53 इंचाची Halo+ FHD फुल स्क्रीन देण्यात आली आहे. यात AI ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 16MP Sony IMX499 सेंसर असून यात नॉमेल आणि सुपर नाईट मोड देण्यात आला आहे. 8MP सेकंड कॅमेरा हा अल्ट्रा वाइल्ड लेन्सचा असून तिसरा कॅमेरा 2MP चा असून यात सुपर मॅक्रो लेन्स देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB रोम ची किंमत 10, 990 रुपये असून 6GB रॅम आणि 64GB रोमची किंमत 11,990 रुपये आहे.

हेदेखील वाचा- Apple कंपनी तर्फे खास सोहळ्यात iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max करण्यात आले लाँच; जाणून घ्या या किंमत व खासियत

4) Redmi Note 8

रेडमी नोट 8 प्रो या स्मार्टफोनची भारतात किंमत 14,999 रुपयांपासून आहे. ही किंमत 6GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज असणारा स्मार्टफोन आहे. तर 6GB RAM आणि 128 स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 15,999 रुपये द्यावे लागणार आहेत. 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी 17,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या नव्या गेमिंग प्रोसेरस हिलिओ जी90टी चा उपयोग करण्यात आला आहे. युजर्सला गेम खेळताना सहज स्मार्टफोनचा वापर करता येण्यासाठी कंपनीने लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानाचा एक भाग समजला जात आहे. Redmi Note 8 Pro साठी 4,500 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

5) Realme X

Year Ender 2019:आकर्षक डिझाईन्स आणि दमदार फिचर्स असलेले या वर्षातील 'Top 5' Smartphones Watch Video 

या स्मार्टफोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 16,999 रुपयांत मिळत आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 19,999 रुपयांत मिळत आहे.

तर हे होते 2019 मधले सर्वोत्कृष्ट फिचर स्मार्टफोन्स. जे भले किंमतीने जास्त असो वा किंमतीने कमी. मात्र त्यांची स्वत:ची अशी खास ओळख आहे आणि ज्यांनी 2019 मध्ये स्मार्टफोन जगतात अक्षरश: धुमाकूळ घातला.