Photo Credit- X

Telangana Police: हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल(Stolen Smartphone) परत मिळवण्यात तेलंगणा पोलीसांनी देशात दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. पोलीस महासंचालक जितेंदर यांनी रविवारी सांगितले. तेलंगणा पोलिसांनी (Telangana Police)चालू वर्षात 25 जुलैपर्यंत 21,193 मोबाईल उपकरणे जप्त केले आहेत. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल तेलंगणातील सर्व 780 पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे, असे पोलीस प्रमुखांनी सांगितले. 2024 मध्ये 206 दिवसांच्या कालावधीत एकूण 21,193 हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल डिव्हाईस जप्त करण्यात आले, त्यापैकी शेवटचे 1,000 आठ दिवसांत परत मिळवून तक्रारदारांच्या ताब्यात दिले.

सरासरी, दररोज 82 मोबाईल रिकवर केले जात असल्याचं म्हटलं जात आहे. एप्रिल 2024 मध्ये दररोज 73 तक्रारी वाढल्या आहेत. मोबाईल चोरी आणि बनावट मोबाईल उपकरणांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी CIER दूरसंचार विभागाद्वारे विकसित केले गेले. हे पोर्टल अधिकृतपणे 17 मे 2023 रोजी देशभरात सुरू करण्यात आले आणि ते प्रायोगिक तत्त्वावर तेलंगणामध्ये 19 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक शिखा गोयल यांना CEIR पोर्टलसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्या अंतर्गत कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 189 दिवसांत 10,000 हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल, 291 दिवसांत 20,000, 395 दिवसांत 30,000 आणि 459 दिवसांत 37,000 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. हैदराबाद आयुक्तालयाने 3808 मोबाईल उपकरणांसह सर्वाधिक रिकव्हर केली आहे. त्यानंतर राचकोंडा आयुक्तालयाने 2,174 आणि सायबराबाद आयुक्तालयाने 2,030 मोबाईल उपकरणांसह रिकव्हर केली आहे.